जान्हवी कपूरचे तिरुमला दौरे का वाढले? काय आहे कनेक्शन? अखेर तिनेच केला खुलासा

Janhvi Kapoor Tirumala Temple Connection : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि तिरुमाला मंदिराचं काय आहे खाय कनेक्शन...

दिक्षा पाटील | Updated: Mar 25, 2024, 12:43 PM IST
जान्हवी कपूरचे तिरुमला दौरे का वाढले? काय आहे कनेक्शन? अखेर तिनेच केला खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Janhvi Kapoor Tirumala Temple Connection : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या 'देवारा' या तेलगू चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून जान्हवी ही तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.  सुरुवातीला तिचा हा चित्रपट 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, आता त्याच्या प्रदर्शनाची तारीख ही पुढे ढकळण्यात आली असून हा चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. आता तिचं चर्चेत असण्याचं कारण तिरुमला मंदिर आहे. अनेकदा जान्हवी ही तिरुमला मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी गेल्याचे पाहायला मिळते. त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, आता तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ती गुडघे टेकवत संपूर्ण पायऱ्या चढत मंदिरात जाताना दिसते. पण कोणतीही गोष्ट असली की जान्हवी ही तिरुमला मंदिरात का जाते? त्या मागचं खरं कारण काय आहे हे जाणून घेऊया. 

जान्हवी कपूरनं तिच्या आणि तिरुमला कनेक्शनविषयी एका मुलाखतीत सांगितलं की हे सगळं तेव्हा सुरु झालं जेव्हा ती छोटी होती आणि श्रीदेवी तिला तिरुमाला मंदिरात घेऊन जायची. तिनं सांगितलं की "मला तिथे जायला खूप आवडतं कारण तिरुमालाशी माझं एक विशेष आध्यात्मिक संबंध आहे. मी आधीच 50 वेळा जाऊन आले आहे आणि आता जेव्हापण मी तिथे जाते तेव्हा माझ्यासोबत काही चांगलं होतं." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जान्हवी कपूर यावर्षी तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणजेच 6 मार्च रोजी तिरुमाला मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी गेली होती. तर या वर्षी जान्हवीनं तिचा 27 वा वाढदिवस तिथे साजरा केला. त्यानिमित्तानं तिच्यासोबत कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया आणि मित्र ऑरीनं देखील हजेरी लावली होती. ऑरीनं त्याचा एक व्लॉग देखील केला आहे. या व्लॉगमध्ये त्या तिघांनी संध्याकाळच्या वेळी 3000 पायऱ्या चढण्यास सुरुवात केली आणि ते मध्य रात्री वरती पोहोचले. दरम्यान, परंपरेनुसार, भक्तांकडून ही अपेक्षा केली जाते की शेवटच्या 500 पायऱ्या ते गुढग्यांवर उभे राहत चढतील. जान्हवी या परंपरेनुसार करताना दिसते. 

हेही वाचा : कुटुंबात खरंच वाद! काहीही काय... बच्चन कुटुंबासोबत ऐश्वर्यानं आनंदानं साजरी केली होळी

दरम्यान, जान्हवी कपूर नुकतीच तिचे वडील बोनी कपूर यांच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेता राम चरणच्या हैदराबादच्या घरी गेली होती. त्या दोघांनी सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं की आता "#RC16 ची प्रतिक्षेत आहे."