खिशात पैसे नाहीत म्हणून रेल्वेच्या शौचालयात लपून बसायचा 'हा' लोकप्रिय गायक

त्यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली होती ज्यामुळे त्यांना मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. 

Updated: Oct 10, 2022, 09:01 PM IST
खिशात पैसे नाहीत म्हणून रेल्वेच्या शौचालयात लपून बसायचा 'हा' लोकप्रिय गायक  title=

Bollywood Actor Stuggle Story: बॉलीवूड अभिनेते किंवा अभिनेत्री सर्वांपेक्षा आलिशान आयुष्य जगतात हेच आत्तापर्यंत आपण ऐकत आलो आहोत. त्यातून एक पिक्चर हिट झाला की कलाकारांचे आयुष्य बदलतं हे जरी खरं असलं तरी अनेक कलाकारांच्या बाबतीत आर्थिक संघर्षही कमी नसतात असेच एक ज्येष्ठ अभिनेते होते ज्यांचा संघर्ष ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. (Celebrity Struggle Story) शून्यातून सुरूवात करत त्यांनी यशाचं शिखर गाठलं असलं तरी त्यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली होती ज्यामुळे त्यांना मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जावं लागलं होतं. (why famous bollywood music director jagit singh used hide in toliet while travelled by train)

आम्ही बोलतोय त्या कलाकाराचं नाव आहे जगजीत सिंह. (Jagjit Singh) जगजीत सिंह हे हिंदीतले सर्वांत नामवंत शास्त्रीय गायक आणि संगीतकार होते. त्यांच्या आयुष्यात त्यांना अनेक उत्तोमत्तम सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत परंतु त्यांच्या जीवनात मात्र लहानपणापासून अनेक संघर्षांचा सिलसिला राहिला आहे. त्यामुळे त्यांचं नावं आजही लोकांच्या कायम लक्षात आहे. अकरा वर्षांपुर्वी आज 10 ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झालं. तेव्हा जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील त्या कठीण प्रसंगांबद्दल. (Jagit Singh Death Anniversary)

आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...

जगजीत सिंह जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आले होते तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांना सात दिवस मुंबईत राहायचे होते परंतु खिशात पैसे नाहीत म्हणून त्यांना सलग सात दिवस मोठा संघर्ष करावा लागला होता. त्यातून जेव्हा ते प्रवासासाठी रेल्वेच्या डब्यात चढले तेव्हा पैसे नसल्यामुळे त्यांनी टिकट काढले नाही.

त्यामुळे जेव्हा टिकीट चेकर म्हणजे टीसी डब्यात शिरला तेव्हा त्याला पाहून जगजीत सिंह घाबरले आणि ट्रेनच्या शौचालयात जाऊन लपले. त्यांना संपुर्ण प्रवास नाईलाजानं शौचालयातच अधिक घालवावा लागला. टीसी दिसला की तिथं जाऊन ते लपतं किंवा लपण्यासाठी दुसरी जागा पाहत. 

आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'

जगजीत सिंह हे गजलसाठी लोकप्रिय होते. त्यांच्या याचं संघर्षमय जीवनावर आधारित चरित्रही प्रकाशित झाले आहे. एवढेच नाही तर संगीतापासून त्यांना लहानपणी त्यांच्या वडिलांनी दूर लोटायचा प्रयत्नही केला होता. समोर आलेल्या माहितीनुसार एकदा ते लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना खूप मारले होते. त्यांच्या तोंडून हिंदी चित्रपटातील गाणं गुणगुणताना ऐकल्यामुळे वडिलांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून ते कसेबसे वाचले कारण त्यांना वाचवण्यासाठी खुद्द त्यांच्या बहिणीला त्यांचे अंग झाकावं लागलं होतं.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जगजीत सिंह यांच्या गजल आजही लोकप्रिय आहेत आणि त्यांच्या गाण्यांचे लोक आजही मोठे चाहते आहेत.