'ढोंगी', इराणी महिलांना पाठिंबा दिल्यामुळे प्रियांका चोप्रा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

प्रियांकाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. 

Updated: Oct 10, 2022, 12:01 PM IST
'ढोंगी', इराणी महिलांना पाठिंबा दिल्यामुळे प्रियांका चोप्रा ट्रोलर्सच्या निशाण्यावर title=

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. इराणमध्ये सुरु असलेल्या हिजाबच्या वादाला आणि विरोधाला प्रियांकानं पाठिंबा दिल्यापासून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. अनेकांनी प्रियांकाला ढोंगी म्हटले आहे. प्रियांकानं इराणमधील ज्या महिलांनी हिजाबच्या विरोधात कसे धाडस दाखवले आणि आवाज उठवला त्यांचे कौतुक केले. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रियांकानं तिचं मत मांडलं पण त्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. 

आणखी वाचा : सरोगेसी की अडॉप्शन? बाळाला हातात घेण्याआधीच नयनतारा ट्रोलिंगची शिकार

सोशल मीडियावर नेटकरी प्रियंकावर खूपच आगपखड करताना दिसत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की प्रियंका भारतीयांना सोडून प्रत्येक देशातील लोकांना पाठिंबा देण्यासाठी सज्ज असते. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की प्रियंकाला या गोष्टीचं काही घेणंदेणं नाही की आपल्या भारत देशात काय चाललंय. एका नेटकऱ्यानं बिलकिस बानोचं उदाहरण देत लिहिलं आहे की, 'प्रियांकानं इराणच्या महिलांप्रती जे समर्थन दिलं आहे,ते चांगलच आहे पण बिलकिस बानोसोबत जे घडलं तसंच आपल्या भारत देशातील इतर महिलांसोबत जे घडतंय त्यावर मौन बाळगणं तिला शोभतं का. त्यावर तिनं कधीच आवाज उठवला नाही. यावर खरंच विचार व्हायला हवा'. नेटकऱ्यांची तक्रार आहे की प्रियांका नेहमी इतर देशातील समस्यांवर आवाज उठवते पण आपल्या भारतातील महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलताना मात्र तिला त्रास होतो.

आणखी वाचा : अजय देवगणला मुलगा युगनं लगावली होती कानशिलात, पाहाताच कुटुंबातील सदस्यांना बसला होता धक्का

गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलीत बिलकिस बानोवर गॅंगरेप झाला होता आणि त्यावेळी तिच्या नजरेसमोर कुटुंबातील सात सदस्यांची हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या 11 आरोपींना काही दिवसांपूर्वीच सोडण्यात आलं. तेव्हा मात्र प्रियंका त्यावर काहीच बोलली नाही आणि नेटकऱ्यांना हेच खटकलं आणि त्यांनी प्रियांकावर ट्रोल केलं. असं याआधी देखील अनेकदा घडलंय जेव्हा प्रियांकाने इतर देशातील मुद्द्यांवर आवाज उठवला आणि म्हणूनच ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. (Priyanka Chopra Attacked Mercilessly For Supporting Iranian Women Over Hijab Protest Call Her Hypocrite) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

Priyanka Chopra Attacked Mercilessly For Supporting Iranian Women Over Hijab Protest Call Her Hypocrite

बातमीची लिंक : 'ही' जन्म तारीख असणाऱ्या लोकांसाठी ऑक्टोबरचा दुसरा आठवडा असेल शुभ!

एकीकडे प्रियांका सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार झाली आहे, तर दुसरीकडे प्रियांकाला दिग्दर्शक अशोक पंडीत यांनी पाठिंबा दिला आहे. अशोक पंडित यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत प्रियांकाला पाठिंबा दिला आहे. प्रियांकाची एक पोस्ट शेअर करत ते म्हणाले, 'मी प्रियंका चोप्रा जीचे कौतुक करतो कारण महसा अमीनच्या मृत्यूनंतर आंदोलन करणाऱ्या महिलांना तिनं पाठिंबा दिला आहे, हे कौतुकास्पद आहे. तू हे पुन्हा एकदा दाखवून दिलेस की चूकीच्या गोष्टीच्या विरोधात राहण्याची तुझ्यात हिंमत आहे. मी आशा करतो की चित्रपटसृष्टी आणि छोट्या पडद्यावरील लोक तुझ्याकडून काही शिकतील.'