'मै झुकेगा नही...', कोणाला म्हणतायेत महेश मांजरेकर ? 

 झी स्टूडिओचा नवा सिनेमा 'पांघरुण' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय

Updated: Jan 31, 2022, 05:10 PM IST
'मै झुकेगा नही...', कोणाला म्हणतायेत महेश मांजरेकर ?  title=

मुंबई : झी स्टूडिओचा नवा सिनेमा 'पांघरुण' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  'काकस्पर्श'  आणि 'नटसम्राट' यांसारख्या दर्जेदार कलाकृतींनंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा बहुचर्चित चित्रपट 'पांघरुण', प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटातील गाण्यांचंही संगीतप्रेमींकडून भरभरून कौतुक होत असतानाच आता त्याचा ट्रेलरलाही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळवत आहे. त्यामुळे आता सिनेमाविषयीची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आहे.

सिनेमाच्या प्रमोशनसाठी झी २४ तासच्या ऑफिसला मांजरेकरांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत सिनेमारीची स्टारकास्टही उपस्थित होती. 

गप्पांचा फड रंगलेला असतानाच 'पुष्पा'चाही विषय यावेळी निघाला. गप्पांच्या मैफिलीला खरा रंग तेव्हा चढला जेव्हा खुद्द महेश मांजरेकर यांनी 'पुष्पा'ची झलक दाखवली.

आता आम्ही काय बोलतोय याबद्दल तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना? तर आज आम्ही तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत जो पाहून तुम्हही भारावून जाल.

महेश मांजरेकर यांनी 'पुष्पा'च्या स्टाईलमध्ये डायलॉग म्हणत अल्लू अर्जुनलाही चांगलीच टक्कर दिली. ''पुष्पा नाम सुनके Flower समझे क्या, फायर है मे... झुकेगा नही'' असं ते मोठ्या आवेगात म्हणाले. 

अर्थात इथे आवेग हा त्या डायलॉगचा जीव ठरला. हा व्हिडिओ झी २४ तास ऑफिशिअल इंस्टाग्राम अकांऊन्टवर शेअर करण्यात आला आहे.

अवघ्या काही वेळात या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. तुम्हीही पाहा, मांजरेकरांनी साकारलेला पुष्पा... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, मांजरेकरांच्या दिग्दर्शनात साकारल्या गेलल्या आगामी 'पांघरूण' सिनेमात अमोल बावडेकर, गौरी इंगवले, रोहित फाळके, विद्याधर जोशी, सुरेखा तळवलकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

हितेश मोडक, डॉ. सलील कुलकर्णी, पवनदीप राजन आणि अजित परब यांचं संगीत आणि वैभव जोशी यांच्या शब्दांनी सजलेल्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. 'ही अनोखी गाठ' आणि 'इलुसा हा देह' या गाण्यांना तर सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.