घटस्फोट का घेतला? म्हणत आमिर खान किरण राव 'त्या' व्हिडीओमुळे ट्रोल

आमिर खान आणि त्याची एक्स पत्नी किरण राव सध्या त्यांच्या आगामी 'लापता लेडीज' या कॉमेडी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर 24 जानेवारीला रिलीज होणार आहे. सध्या ही जोडी या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Updated: Jan 23, 2024, 04:47 PM IST
घटस्फोट का घेतला? म्हणत आमिर खान किरण राव 'त्या' व्हिडीओमुळे ट्रोल title=

मुंबई : मुलगी आयरा खानच्या लग्नानंतर आमिर खान आणि किरण राव कामावर परतले आहेत. आजकाल, दोघेही त्यांच्या बहुप्रतिक्षित आगामी 'लापता लेडीज' चित्रपटासाठी चर्चेत आहेत, ज्याच्या प्रमोशनमध्ये दोघेही व्यस्त आहेत. त्याच वेळी, अलीकडेच त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ते दोघेही त्यांच्या चित्रपटाच्या स्टार कास्टसोबत पापाराझींसाठी पोज देताना दिसत आहेत.
व्हायरल फोटोमध्ये आमिर आणि किरणसोबत स्पर्श श्रीवास्तव, प्रतिभा रंता आणि नितांशी गोयल दिसत आहेत. या व्यतिरिक्त छाया कदम आणि रवी किशन देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

नुकताच आमिर खानच्या लेकीचा आयरा खानचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या शाही लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली होती. लग्नानंतर आयरा आणि नुपूर शिखरे हनिमूनला गेले आहेत. लग्नाचा  माहोल संपल्यानंतर आता आमिर खान आणि किरण राव पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. मुलीच्या लग्नानंतर ही जोडी कामावर परतले आहेत. व्हायरल फोटोमध्ये आमिर आणि किरणसो एकत्र पोझ देताना दिसत आहेत. यासोबतच या सिनेमाची स्टारकास्टही या दोघांसोबत तिथे उपस्थित होती. स्टारकास्टसोबतही या दोघांनी भरपूर पोज दिल्या. सध्या हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

यावेळी  किरण रावने लापता लेडीज सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान जांभळ्या रंगाच्या स्लीव्हलेस टॉपसह जीन्स पॅंट कॅरी केली होती. यासोबतच तिची हॅण्डबॅग हा तिच्या लूकमधील आकर्षणाचा विषय होता. यासोबतच तिने ब्लॅक हाय हिल्स घातले होते. याचबरोबर आमिर खानने ग्रे टी-शर्ट त्यावर काळ्या रंगाचं जॅकेट याचबरोबर यासोबत त्याने ब्लॅक जीन्स परिधान केली होती. हा लूक पुर्ण करण्यासाठी आमिरने यासोबत ब्लॅक बूट्सही घातले. किरण आणि आमिरची ही क्लासिक स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. मात्र आमिर आणि किरण राव यांना एकत्र पाहून सोशल मीडियावर हे दोघंही खूप ट्रोल होत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वूम्पला या इन्स्टा पेजने या दोघांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावेळी या पोस्टच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करत युजर्सने त्यांना खूप ट्रोल केलं आहे. एकाने कमेंट करत लिहीलं की, किरण राव आणि आमिर खान छान दिसत आहेत पण किरण जींची हेअर स्टाइल थोडी विचित्र आहे. तर अजून एकाने लिहीलं, घटस्फोट का घेतला? तर अजून एकाने म्हटलंय, घटस्फोटासाठीही आमिर खान मिस्टर परफेक्शनिस्ट आहे. अशा अनेक प्रकारच्या कमेट युजर्स या व्हिडीओवर करत आहे.