विराट कोहली सगळ्यांसमोर अनुष्काला का म्हणाला 'बिल्ली'?

विराट कोहलीने एक फोटो शेअर केला आहे.

Updated: Nov 23, 2021, 03:51 PM IST
विराट कोहली सगळ्यांसमोर अनुष्काला का म्हणाला 'बिल्ली'? title=

मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने एक फोटो शेअर केला आहे. जेव्हा त्याची पत्नी अनुष्काने या फोटोवर कमेंट केली तेव्हा विराटने मजेदार आणि रोमँटिक पद्धतीने उत्तर दिलं आणि तिला मांजर म्हटलं. आता इंस्टा यूजर्स विरुष्कासोबत मस्ती करताना दिसत आहेत.

फोटोमध्ये विराटच्या मांडीवर एक मांजर  बसलेलं दिसत आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'प्रॅक्टिस सेशनमधून एक कूल मांजराकडून हॅलो' तो मांजरासोबत एकदम कुल स्टाईलमध्ये दिसत आहे. अवघ्या तासाभरात या फोटोला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत.

विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने ही पोस्ट पाहिल्यावर तिनेही मांजरीला 'हॅलो' म्हटलंय. अनुष्काच्या या कमेंटवर विराटने देखील मजेदार रिप्लाय दिला आहे. अनुष्काला मजेदार आणि रोमँटिक पद्धतीने उत्तर देताना विराटनं लिहिलं की, ''लौंडा दिल्ली से है और बिल्ली मुंबई की है.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खरंतर विराट हा दिल्लीचा तर अनुष्का मुंबईची आहे. विराटचा हा रिप्लाय आल्यावर इन्स्टा यूजर्सने विराटचा फ्लर्टिंग मूड जाणवला आणि म्हणायला लागले- 'होय हे पण खरं आहे.' यापूर्वी विराटने दोन दिवसांपूर्वी एक पोस्टही शेअर केली होती. ज्यामध्ये तो पत्नी अनुष्कासोबत दिसत होता. या पोस्टबाबत अनेक यूजर्सने त्याला क्रिकेटवरही थोडं लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता.