.... म्हणून सपना चौधरीला गुपचूप करावं लागलेलं लग्नं

कोण आहे सपना चौधरीचा पती.... 

Updated: Oct 7, 2020, 04:21 PM IST
.... म्हणून सपना चौधरीला गुपचूप करावं लागलेलं लग्नं title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : लोकप्रिय हरयाणवी गायिका आणि डान्सर सपना चौधरी sapna chaudhary  हिनं एका गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्या आयुष्यातील या वळणानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मुळात सपनाच्या लाखो चाहत्यांच्या तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत फारशी माहिती नाही. मुख्य म्हणजे बाळाच्या जन्माची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचताच अखेर सपनाच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनीही जोर धरला. 

आपण आणि सपनानं स्वत:च्या मर्जीनं लग्न केलं आहे, यावर कोणाचीही हरकत नसावी, अशा शब्दांत सपनाचा पती वीर साहू यांनं सोशल मीडियाच्या माध्यमातून या नात्याबाबत चर्चा करणाऱ्यांना उत्तर दिलं. 

नात्याची चर्चा... 

सपना आणि वीर यांच्या नात्याची चर्चा सुरु होती. पण, त्या दोघांनीही कधीच या नात्याची कबुली दिली नाही. आता मात्र हा वीर साहू आहे तरी कोण, याबाबत जाणून घेण्यासाठीसुद्धा कुतूहल पाहायला मिळत आहे. 

'झी न्यूज हिंदी'च्या वृत्तानुसार सपनाची आई, नीलम यांनी तिच्या लग्नाची माहिती दिली. याच वर्षी जानेवारी महिन्यात सपना आणि वीरनं कोर्ट मॅरेज पद्धतीनं लग्न केलं होतं. त्यादरम्यान वीर साहूच्या आत्याच्या पतीचं निधन झाल्यामुळं कोणत्याही प्रकारचा मोठा सोहळा करण्यात आला नव्हता. मुख्य म्हणजे लग्नाबाबत काहीच माहिती नसली, तरीही सपना आणी वीरनं साखरपुडा केल्याचं मात्र म्हटलं जात होतं. जवळपास चार वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. 

 

वीर साहू आहे तरी कोण? 

वीर साहू हा एक गायक, संगीतकार, गीतकार आणि हरयाणवी अभिनेता आहे. बब्बू मान या नावानंही तो ओळखला जातो. संगीत क्षेत्रात नाव कमवण्यासाठी म्हणून त्यानं वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण सोडलं होतं.  २०१६ मध्ये 'ठाडी बॉडी' या म्युझिक व्हिडिओनं त्याला कमालीची लोकप्रियता मिळवून दिली होती.