'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातून गंगू आणि नेहरूंचा 'तो' सीन का वगळला?

'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, 25 फेब्रुवारी रोजी होणार प्रदर्शित...   

Updated: Feb 24, 2022, 12:48 PM IST
'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातून गंगू आणि नेहरूंचा 'तो' सीन का वगळला? title=

मुंबई : हुसैन जैदी यांच्या 'माफिया क्विन' पुस्तकावर आधारित 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा 25 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्री आलिया भट्ट गंगूबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. मुंबईमध्ये देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी त्यांचा लढा सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाला अनेक वादांनी घेरलं असला तरी, सेन्सॉर बोर्डाने UA सर्टिफेकेट देवून सिनेमाला हिरला कंदिल दिला आहे.  पण सिनेमाला बोर्डाने हिरवा कंदिल देण्यापूर्वी अनेक सीनवर कात्री मारली आहे. 

'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात करण्यात आलेले चार महत्त्वाचे बदल
1. सिनेमात एक शिवी वापरण्यात आली होती. पण त्या शिवीच्या जागी आता 'मादरजात' हा शब्द वापरण्यात आला आहे. शिवाय 17 सेंकडचा एक सीन ज्यामध्ये शिवी वापण्यात आली होती. तो सीन वळण्यात आला आहे. 

2. सिनेमाच्या निर्मात्यांना हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांमध्ये डिस्ल्केमर टाकण्यास सांगितलं आहे. ज्यामुळे सिनेमा 5 सेकंदाने वाढला आहे. 

3. महत्त्वाचं म्हणजे सिनेमातून तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू आणि गंगूबाई यांच्या भेटीचा किस्सा वगळण्यात आला आहे. ज्यामुळे पुढे वाद होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. 

4. एक सीन आहे, ज्यामध्ये नेहरू गंगूबाईच्या खांद्याला फूल लावतात. तो एक सीन देखील वगळण्यात आला आहे.