मुंबई : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी'यांच्यावर आधारित सिनेमाचा पहिला लूक समोर आला. काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या फर्स्ट लूकमधून हे स्पष्ट झालं की, मोदींची भूमिका अभिनेता विवेक ओबेरॉयसाकारणार आहे. सिनेमात नरेंद्र मोदींच्या भूमिकेसाठी विवेक ओबेरॉयची निवड का केली? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला. निर्मात्यांनी विवेक ओबेरॉयचीच का निवड केली?
या प्रश्नाची सुरूवात होण्यामागचं कारण, या अगोदर मोदींच कॅरेक्टर प्ले करण्यासाठी अभिनेता परेश रावल यांच नाव पुढे आलं होतं. मग अचानक विवेक ओबेरॉयचा फर्स्ट लूक समोर आला. त्यामुळे सामान्य जनतेने आणि मोदी चाहत्यांना प्रश्न पडला. याचं उत्तर निर्माता संदीप सिंह यांनी एका मुलाखतीत दिलं आहे.
सिंह यांनी सांगितलं, मुख्य भूमिकेसाठी विवेक ओबेरॉयची निवड करण्यामागची अनेक कारण आहेत. सर्वात अगोदर या भूमिकेसाठी एक अनुभवी अभिनेता आणि उत्तम कलाकार हवा होता. विवेक गेली 18 वर्षे या क्षेत्रात काम करत आहे. विवेक एक असा कलाकार आहे ज्याने 'कंपनी' आणि 'साथिया' सारख्या सिनेमांमध्ये वैविध्यपूर्ण काम केलं आहे.
काही दिवसांपूर्वी परेश रावल यांच नाव चर्चेत होतं. त्याबद्दल सिंह म्हणाले की, मी 2014 पासून ऐकतोय की, या सिनेमाकरता परेश रावल असणार आहेत. पण आम्ही या अगोदर कधीच परेश रावल यांच्याशी यासंबंधी संपर्क केला नव्हता.
पुढे सिंह म्हणाले की,'कथा ही 'मेरी कॉम'ची असो किंवा 'सरबजीत' किंवा आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असो. या सगळ्यांच्या कथांनी मला प्रेरित केलं आहे. विचार करता हे लक्षात येईल की, आता सिनेमांचा व्यवसाय हा बदलला आहे. आता बॉक्स ऑफिसवरील कमाई ही कथेवर अवलंबून असते. त्याकरता कलाकार महत्वाचा राहिलेला नाही.' पुढे सिंह म्हणाले की, 'गेलं वर्ष या गोष्टीची साक्ष देत आहे. याकरता मी गोष्टीचा भाग होणं ठरवलं आहे. जी गोष्ट आपल्या सतत डोक्यात राहिलं. कुणा व्यक्तीची गोष्ट ही कायम आपल्याला प्रेरित करत असते.'
यावर ते म्हणाले की, 'मी पंतप्रधान मोदींवर या करता सिनेमा करू इच्छितो कारण त्यांच जीवन प्रेरणादायी आहे. जेव्हा मी इतरांनी ही कल्पना सांगितली तेव्हा मला खूप सकारात्मक उत्तर मिळाली. पण ही गोष्ट अधिक रिस्की आहे. कारण आताच्या पंतप्रधानांबद्दल लोकांच्या मनात अनेक विचार आहेत. गेल्या चार वर्षांपासून मी या करता सिने जगतातून सहयोग मागितला आणि मला तो मिळाला. ही सिनेमा त्यांच्या तरूणपणापासून सुरू होतो म्हणून मला अशी व्यक्ती हवी होती, जी त्यांचा 20 ते 60 वर्षांपर्यंतचा प्रवास मांडू शकेल. याबाबत विवेक योग्य कलाकार आहे. '