मुंबई : सलमान खान लग्न कधी करणार याकडे संपूर्ण इंडस्ट्रीचं लक्ष लागलं आहे. एकीकडे बॉलिवूडचे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. मात्र सलमान काही लग्नाचं नाव घेताना दिसत नाहीये. अनेकदा सलमानचे असे फोटो व्हायरल होतात. ज्यामुळे सलमानच्या लिंकअपच्याही बातम्या समोर येतात. नुकताच सलमानचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत तो एका मिस्ट्रीगर्लसोबत दिसत आहे.
खरंतर व्हायरल होणारा हा फोटो जुना आहे. सध्या सलमान खानच्या एका फोटोची खूप चर्चा होत आहे. खरंतर या फोटोमध्ये भाईजान एकटा नाही, तर तो एका मुलीसोबत पोज देताना दिसत आहे, त्या मुलीने सलमानच्या छातीवर हात ठेवला आहे आणि अभिनेताही यावर न डगमगता स्माईल देताना दिसत आहे. या फोटोनंतर त्याच्या लग्नाची खूप चर्चा सुरु झाली आहे.
खरंतर, अचानक हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सलमान खानच्या जवळ अशी कोणतीही मुलगी आजवर दिसली नव्हती, त्यामुळे याबद्दल चर्चा व्हायलाच हवी होती आणि तसं झालं. हे पाहून चाहत्यांनी यावर खूप मजेशीर कमेंट करायला सुरुवात केली.
एका यूजरने लिहिलं, सलमान भाई आता लग्न कर, तर अजून एकाने कमेंट करत म्हटलं की, कतरिना कैफसोबतही सलमान भाई इतका खूश नव्हता. तर अजून एका यूजरने बाकीच्या ट्रोलर्सवर टीका केली आम्ही तुम्हाला सांगतो की, ती सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री आहे. अतुल आणि अलविरा अग्निहोत्री यांची मुलगी.
ते काहीही असो, पण या फोटोबाबत सोशल मीडियावर बराच गदारोळ सुरू झाला आहे. पण हा फोटो 2013 मधला म्हणजेच जवळपास 10 वर्ष जुना असल्याचं बोललं जात आहे. जर ती खरंच अलिझेह अग्निहोत्री असेल तर तिचा लूक आणि स्टाइल 10 वर्षात खूप बदलली आहे. सलमान खानबद्दल बोलायचा झालं तर त्याचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. आज या चित्रपटाचं दुसरं गाणंही रिलीज झालं आहे. या चित्रपटात पूजा हेगडेसोबतची त्याची जोडी खूप पसंत केली जात आहे. याशिवाय सलमान टायगर 3 मुळे चर्चेत आहे.