'हा राजकारणातला 'भोंगा'असला तरी सर्वांची झोप उडवतो' - चित्रा वाघ

शिवसेना महापौर किशोरी पेडणेकर आणि चित्रा वाघ यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Updated: Apr 4, 2022, 10:16 PM IST
'हा राजकारणातला 'भोंगा'असला तरी सर्वांची झोप उडवतो' - चित्रा वाघ title=

मुंबई : शिवसेना महापौर किशोरी पेडणेकर आणि चित्रा वाघ यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिमध्ये त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामध्ये त्या बोलताना दिसत आहेत की, राजकारणातला कोणता नेता त्यांना 'भोंगा' वाटतो .

होस्ट संकर्षण कऱ्हाडे किशोरी पेडणेकर यांना एक चॅलेंज देतो. आणि म्हणतो, 'एक पेटारा येणार आहे त्यातून काही वस्तू निघतील. त्या वस्तू पाहिल्यानंतर तुम्हाला राजकारणातले कोणत्या माणसाचं नाव आठवतंय हे तुम्ही सांगायचं आहे'. यानंतर किशोरी ताई त्या पेटाऱ्यातून जिलेबी काढतात. आणि यावेळी त्या आमदार गिरीश महाजन यांचं नाव घेतात. आणि म्हणतात, 'गिरीश महाजन ही पर्सनालिटी छान आहे. आणि बोलतातही गोड फक्त गोलगोल''. यानंतर संकर्षण चित्रा वाघ यांना विचारतो, 'तुम्ही सहमत आहात का?' यावर त्या म्हणतात, 'मी जरा कामात बिझी आहे आपण नंतर बोलूया.'

यानंतर पुढे संकर्षण पेटाऱ्यातून एक भोंगा काढतो. आणि म्हणतो, 'राजकारणातील भोंगा कोण?' यावंर किशोरी ताई म्हणतात. 'किरीट सोमय्या' त्यानंतर चित्राताई  मागून म्हणतात. 'त्या भोंग्याने जाग येते सगळ्यांना. झोपू शकतं नाही कोणी'. हा संपूर्ण किस्सा झी मराठी वाहिनीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमात पार पडला आहे. हा एपिसोड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.