मुंबई : बऱ्याचवेळा आपण पाहतो की सहकलाकार म्हणून एका चित्रपटात काम करणारे सेलिब्रिटी खऱ्या आयुष्यात चांगले मित्र होतात. दरम्यान, बॉलिवूडचा अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि किंग खान शाहरुख खान
(Shahrukh Khan) यांनी चित्रपटात एकत्र काम केलं असलं तरी देखील ते चांगले मित्र नाहीत. ते दोघं जवळपास 16 वर्षांपासून एकमेकांशी बोलत नव्हते.
काही वर्षांपूर्वी सनी देओलनं शाहरुखच्या विरोधात अशी एक कमेंट केली होती ज्यानंतर त्या दोघांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं होतं. बरेच सेलिब्रिटीज हे पैशासाठी विवाहसोहळ्यात आणि पार्ट्यांमध्ये डान्स करताना दिसतात. यात शाहरुख, अक्षय कुमार आणि रणवीर सिंगसारखे सेलिब्रिटी अशा कार्यक्रमांमध्ये डान्स करतात आणि त्यासाठी खूप पैसे देखील घेतात, असे म्हटले जाते. दरम्यान, अशा सेलिब्रिटींवर सनी देओलनं ताशेले ओढले होते.
आता या सगळ्यात सनी देओल काय म्हणाला होता त्यापेक्षा त्या दोघांमध्ये वैमनस्य का झाले हे जाणून घेऊया... 1993 साली प्रदर्शित झालेल्या डर या चित्रपटाच्या सेटवर दिवंगत निर्माते यश चोप्रा हे शाहरुखला जास्त महत्त्व देत होते. सनीच्या सुनील मल्होत्रा या भूमिकेच्या तुलनेत शाहरुखच्या राहुल या भूमिकेला प्रेक्षकांकडून अधिक प्रेम मिळालं. यावर बोलताना सनी असं देखील म्हणाला की चोप्रा हे जे बोलतात ते करत नाहीत.
पूर्वी, शाहरुख चांगली कमाई करण्यासाठी लग्नसमारंभात आणि इतर खासगी कार्यक्रमांमध्ये तो डान्स करायचा आणि त्याविषयी शाहरुखनं वक्तव्य केल्यानंतर सनी देओलनं यावर वक्तव्य केलं. सनी देओलनं लगेच एका मॅगझिनला मुलाखत दिली आणि अप्रत्यक्षपणे,म्हणाला 'लग्नात फक्त मुजरा करणारे नाचतात, कलाकार नाही. मला वाटतं की कलाकारांनी त्यांची प्रतिष्ठा राखली पाहिजे. मित्राच्या लग्नात डान्स करणं ठीक आहे, पण डान्स करण्यासाठी पैसे घेणं हे चीप आहे.'