मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग ही जोडी चाहत्यांच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून ते वेगळे झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्यांच्या आवडत्या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या बातमीने चाहते अस्वस्थ आहेत.
खरं तर, काही काळापूर्वी एका ट्विटमध्ये असा दावा करण्यात आला होता की, दोघांच्या नात्यात काहीतरी बिनसलं आहे. आणि आता दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दोन्ही स्टार्सनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या अफवांना पूर्णविराम दिला.
रणबीर कपूरने २००७ मध्ये दीपिका पदुकोणला डेट करायला सुरुवात केली होती. जिथे मोठ्या पडद्यावर दोघांची जोडी लोकांना खूप आवडली. त्याचबरोबर ऑफस्क्रीन लोकांनाही या दोघांना पसंती मिळू लागली. दोघंही रोज एकत्र स्पॉट व्हायचे. असं म्हटलं जातं की दीपिकाने रणबीरच्या कुटुंबातही मिसळण्याचा प्रयत्न केला होता.
पण ती आपली जागा बनवू शकली नाही. रणबीरशी ब्रेकअप झाल्यानंतर, दीपिका पदुकोण डिप्रेशनची शिकार झाली होती, यावेळी तिची फिल्मी कारकीर्द देखील चांगली नव्हती. रणबीरने केलेली फसवणूक दीपिका विसरू शकत नव्हती. यामुळेच तिने स्वतःसोबत घडलेल्या गोष्टी लोकांसमोर उघडपणे सांगितल्या.
दीपिका रणबीरच्या इतकी प्रेमात होती की, तिने तिच्या मानेवर त्याच्या नावाचा टॅटूही काढला होता. रणबीर कपूर त्याच्या नात्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. जेव्हापासून तो इंडस्ट्रीत आला आहे. तेव्हापासून त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे.
या अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोणचंही नाव येतं. एक काळ असा होता की, रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण एकमेकांना डेट करायचे. 'बचना ए हसीनो' चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. असं म्हटलं जातं की, दोघं अनेकदा सेटवर एकत्र वेळ घालवत असत. दोघंही अनेकदा सेटवर एकत्र दिसले.
दीपिका रणबीरबाबत खूप गंभीर होती. त्यावेळी दोघंही इंडस्ट्रीत नवीन होते आणि करिअर सेट करत होते. दोघांच्या अफेअरच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. दोघांची जोडीही खूप छान दिसत होती, पण नंतर अचानक त्यांचं नाते संपुष्टात आलं. दीपिका पदुकोणने रणबीर कपूरला दुसऱ्या अभिनेत्रीसोबत पकडलं होतं.
याआधी दोघांच्या ब्रेकअपवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता, पण नंतर सर्वांनाच दोघांच्या ब्रेकअपची खात्री पटली, कारण नंतर रणबीर आणि कतरिना कैफच्या अफेअरच्या चर्चा सर्वत्र होत्या. दीपिकासोबत रिलेशनशिपमध्ये असूनही तो कतरिना कैफला डेट करत होता आणि दीपिकाची फसवणूक करत असल्याच्या बातम्या येत होत्या.
एकदा एका मुलाखतीत रणबीरने दीपिकाची फसवणूक केल्याचं मान्य केलं होतं. एका मुलाखतीदरम्यान रणबीरने सांगितलं की, हो मी दीपिकासोबत फसवणूक केली, कारण त्यावेळी मी परिपक्व नव्हतो. त्यावेळी मी परिस्थितीचा फायदा घेतला. रणबीर पुढे म्हणाला की, जेव्हा मी परिपक्व झालो तेव्हाच मला या गोष्टी समजल्या. जरी आता रणबीर आणि दीपिकाचे ब्रेकअप झालं आहे आणि ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यात खूप पुढे गेले असले तरी आजही ते दोघं खूप चांगले मित्र आहेत.