मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने अखेर मुलगी आयरा खानच्या लग्नाच्या तारखेचा खुलासा केला आहे. याच बरोबर त्याने आपल्या मुलीच्या पाठवणीबद्दलही मोठं वक्तव्य केलं आहे. या क्षणाविषयी बोलताना वडील म्हणून तो भावूकही झाला. आमिरने भावी जावई नुपूर शिखरे याचाही अतिशय गोड परिचय करून दिला. अभिनेता प्रेमाने त्याला जावई म्हणतो असंही त्याने सांगितलं.
आमिर खान सध्या आपल्या परिवार आणि नात्यांवर खूप लक्ष केंद्रित करत आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला की, जेव्हा तो चित्रपटांमध्ये व्यस्त असतो तेव्हा त्याच्या आजूबाजूच्या लोकांचं भान राहत नाही. असं नाही की, काही झालं तर तो भेटत नाही किंवा कुटुंबाला वेळ देत नाही. पण गेल्या काही काळापासून तो त्याच्या कुटुंबाशी असलेल्या नात्याचा आनंद घेत आहे.
आमिर खानची मुलगी आयरा खानचं लग्न कधी?
आमिर खानने न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, आयरा खान 3 जानेवारी 2024 रोजी लग्न करणार आहे. तिने स्वतःसाठी शोधलेला मुलगा खूप सिंपल माणूस आहे. अभिनेत्याने सांगितलं की त्याच्या भावी जावईचं नाव नुपूर शिखरे आहे, जो एक जिम ट्रेनर आहे. तो त्याला प्रेमाने पोपाय म्हणतो, कारण त्याचे मसल असे आहेत.
आमिर खान आपल्या जावईबद्दल काय म्हणाला
भावी जावई नुपूर शिखरेबद्दल, आमिर खानने सांगितलं की, त्याने आपल्या मुलीला तिच्या डिप्रेशनच्या काळात कशी मदत केली. तो नेहमी आयराची सपोर्ट सिस्टीम म्हणून उभा राहिला. त्याला आपल्या मुलीचा अभिमान आहे की तिने स्वतःसाठी एक परिपूर्ण मुलगा निवडला आहे.
आपल्या मुलीच्या जाण्याने आमिर खान आता भावूक झाला आहे
या मुलाखतीत मुलगी आयरा खानच्या लग्नाबाबत आमिर खान म्हणाला, 'मी खूप भावूक आहे. माझ्या मुलीच्या पाठवणीच्या दिवशी मी खूप रडणार आहे. माझ्या कुटूंबात तर आतापासूनच चर्चा होतेय की, आमिरची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. माझ्या मुलीच्या लग्नाचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतश्या माझ्या भावना बाहेर येत आहेत. वडिलांसाठी हा खूप मोठा आणि खास दिवस असतो.