जेव्हा नशेत तर्र्रर जॅकी श्रॉफ तब्बूच्या जवळ आला..., त्यानंतर कधीच दिसली नाही त्यांची जोडी

Jackie Shroff Tabu : जॅकी श्रॉफ आणि तब्बू यांची जोडी कधी मोठ्या पडद्यावर का नाही दिसली? अखेर सगळ्या चाहत्यांच्या प्रश्नाचं कारण आलं समोर...

दिक्षा पाटील | Updated: Feb 1, 2024, 11:50 AM IST
जेव्हा नशेत तर्र्रर जॅकी श्रॉफ तब्बूच्या जवळ आला..., त्यानंतर कधीच दिसली नाही त्यांची जोडी title=
(Photo Credit : Social Media)

Jackie Shroff Tabu : जॅकी श्रॉफ हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. जॅकी श्रॉफ यांचा आज 1 फेब्रुवारी रोजी जॅकी श्रॉफ यांचा 67 वा वाढदिवस आहे. जॅकी श्रॉफ यांचं नाव फक्त त्यांच्या कामामुळेच नाही तर त्यासोबतच त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही तितकेच चर्चेत होते. जॅकी श्रॉफ एकदा एका मोठ्या कॉन्ट्रोव्हर्सीमुळे चर्चेत आले होते. ही कॉन्ट्रोव्हर्सी अभिनेत्री तब्बू संबंधीत आहे. त्या दोघांमध्ये झालेल्या एका घटनेमुळे त्या दोघांनी कधी एकत्र काम केलं नाही. 

तब्बूचं करिअर सुरु होण्याआधी ती तिची बहीण फराह नाजसोबत दिसली होती. या पार्टीत जॅकी श्रॉफ हे देखील उपस्थित होते. या पार्टीत काही असं झालं की तब्बूनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतरही त्यांनी एकत्र काम केलं नाही. 1986 मध्ये ही पार्टी झाली होती आणि ही पार्टी डॅनीच्या घरी होती. या दरम्यान, तब्बूची बहीण फराह नाज आणि जॅकी श्रॉफ दिलजले या चित्रपटात एकत्र काम करत होते. तर चित्रपटाची टीम ही अनेकदा डॅनी यांच्या घरी पार्टी करायचे. अशीच एका पार्टीत फराह नाज तब्बूला घेऊन गेली होती. या पार्टीला खास बनवण्यासाठी जेवणापासून ड्रिंक्स पर्यंत सगळ्या गोष्टींची योजना करण्यात आली होती. सगळ्यांनी आपल्या आपल्या सवयीनुसार, ड्रिंक्स घेतले आणि खूप काही खाल्लं. मात्र, रिपोर्ट्सनुसार, जॅकी श्रॉफ यांनी खूप जास्त दारू पिली होती. त्यानंतर तब्बूसोबत असं काही केलं की फराह नाज संतापली होती. 

हेही वाचा : HBD भिडूः जॅकी श्रॉफ यांचं 8 BHK घर आतून कसं दिसतं, एकदा पाहाच!

पार्टीत जॅकी श्रॉफ यांनी इतकं मद्यपान केलं होतं की जॅकी श्रॉफ खूप जवळजाण्याचा प्रयत्न करत होते. डॅनी यांनी जसं जॅकी श्रॉफ यांनी असं काही करताना पाहिलं, तेव्हा ते त्यांच्या जवळ गेले आणि जॅकी यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तब्बूपासून जॅकीला डॅनी यांनी लांब नेले. मात्र, हे सगळं पाहिल्यानंतर फराह नाज नाराज झाली. त्यावेळी मीडियामध्ये या सगळ्या गोष्टींवर वाद सुरु केला. त्यानंतर हा गैरसमज असल्याचे सांगत त्यांनी सगळ्यांना शांत होण्यास सांगितले होते. मात्र, या पार्टीनंतर तब्बू आणि जॅकी श्रॉफ यांनी कधीच एकत्र काम केलं नाही.