मध्यरात्री आमीर खान हॉस्पिटलमध्ये?

काय केलं आमीर खानने 

मध्यरात्री आमीर खान हॉस्पिटलमध्ये?  title=

मुंबई : मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ तेव्हा येते जेव्हा माणूस स्वतः आजारी असतो किंवा त्याच्या जवळचं कुणी आजारी असं. मात्र काही लोकं अशी असतात जी दुसऱ्यांच्या मदतीसाठी मध्यरात्री हॉस्पिटल गाठतात. असंच काहीस झालंय सुपरस्टार आमिर खानसोबत. ज्यामुळे आमीर खानचे चाहते आणखी खूष झाले आहेत. 

आमीर खानच्या 'दंगल' मधील त्यांच्या टीमधील साऊंड टेक्नीशिअन शाजित कोयरीला मॅसिव स्ट्रोकचा त्रास झाला. मात्र त्यावेळी त्यांचे उपचार करण्यासाठी कुणीही डॉक्टर उपलब्ध नव्हते. टेक्निशिअनच्या कुटुंबियांनी आमीर खानशी संपर्क साधला. आणि आमीर खान मध्यरात्री मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये पोहोचला. आमीर पोहोचताच हॉस्पिटलमधील सगळा स्टाफ आणि डॉक्टर उपचारासाठी धावले. 

आमिर खानने फॅन्स यावेळी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. एवढंच काय तर अनेक फॅन्सनी त्याच्या या गुणांचं कौतुक करताना दिसले. अभिनयासोबतच आमीर खान मिस्टर परफेक्शनिस्ट का आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आली. चाहते आमीर खानच्या 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमाची प्रेक्षक वाट पाहत आहे. आमीर खान सध्या या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. आमीर बिग बी यांच्यासोबत सिल्वर स्क्रिन शेअर करत आहे.