मुंबई : जगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तीमत्व असलेली बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. एक पाकिस्तानी मुलगी लाईव्ह कार्यक्रमादरम्यान प्रियांकावर ओरडली. परंतु या सर्व परिस्थितीचा सामना 'देसी गर्लने' अत्यंत उत्तम प्रकरे केला. शनिवारी दुपारी ब्यूटीकॉल लॉस एंजेलिसमध्ये ही घटना घडली.
That Pakistani girl who jumped @priyankachopra was very disrespectful! #BeautyconLA smh i was supposed to be the next one to ask a question but she ruined it for all pic.twitter.com/KrLWsLEACa
— Kadi (@ItsnotKadi) August 10, 2019
मार्च महिन्यात प्रियांकाने ट्विटरच्या माध्यमातून भारतीय सेनेचं कौतुक केले होते. त्यामुळे उपस्थित पाकिस्तानी मुलीला तिचा राग अनावर झाला आणि ती प्रियांकावर ओरडली. प्रियांका संयुक्त राष्ट्रांमध्ये सदिच्छादूत आहे. त्यामुळे पाकिस्तानी मुलीने तिने केलेल्या ट्विटवर आक्षेप घेतला.
प्रियांकाने तिच्या ट्विटमध्ये फक्त 'जय हिंद (भारत अमर रहे#IndianArmedForces)' असे लिहिले होते. 'तू देशात शांतता प्रस्तापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेत सदिच्छादूत आहेस. तू पाकिस्तानात आण्विक युद्धाला दुजोरा देत आहेस. पाकिस्तानातील लाखो नागरिक तुझे चाहते आहेत.' तिच्या या वक्तव्यानंतर प्रियांकाने तिला उत्तर दिले.
'माझे अनेक मित्रमंडळी हे पाकिस्तानचे रहिवासी आहेत आणि मी एक भारतीय नागरीक आहेत. युद्ध ही एक अशी गोष्ट आहे जी मला अजिबात आवडत नाही. मी एक राष्ट्रभक्त आहे. त्यामुळे जर माझ्या ट्विटमुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मी त्यांची माफी मागते', असं म्हणत या परिस्थितीचा सामना प्रियांका चोप्राने केला.