जेव्हा Ajay Devgnचा जीव वाचवण्यासाठी 250 फायटर्ससोब पोहोचले वीरू देवगन

अजय देवगनने असं काय केलं की वीरू देवगन यांना मुलाचे  प्राण वाचविण्यासाठी घ्यावा लागला मोठा निर्णय  

Updated: Aug 26, 2021, 01:39 PM IST
जेव्हा Ajay Devgnचा जीव वाचवण्यासाठी 250 फायटर्ससोब पोहोचले वीरू देवगन title=

मुंबई : अभिनेता अजय देवगन त्याच्या अभिनयामुळे आणि स्वभावामुळे कायम चर्चेत असतो. अजयची कॉमेडी असो किंवा त्याचे चित्रपटांमधील ऍक्शन सीन प्रत्येक भूमिकेने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. पण फार कमी लोकांना माहिती आहे की एक दिवस असा होता जेव्हा अजयचा जीव वाचवण्यासाठी वडील वीरू देवगन देवगन यांना स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. एका फिल्मी अंदाजात त्यांनी अजयचे प्राण वाचवले होते. सध्या हा किस्सा तुफान व्हायरल होत आहे. 

प्रत्येकाला ठाऊक आहे की वीरू देवगन एक ऍक्शन दिग्दर्शक आहेत. स्टंट आणि ऍक्शन सिक्वेन्स दिग्दर्शित करणारे वीरू देवगन यांनी 'हिंदुस्तान की कसम' चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात अजय देवगनने मुख्य भूमिका साकारली होती. ऍक्शन चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या वीरू देवगन यांनी खऱ्या आयुष्यात मुलाला वाचविण्यासाठी एक शक्कल लढविली होती. 

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये साजिद खान (Sajid Khan), अजय देवगन (Ajay Devgn)  यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. साजिद सांगत आहेत की, 'अजयची पांढऱ्या रंगाची जीप होती. ज्यामध्ये आम्ही फिरायचो. हॉलिडे हॉटेलच्या बाजूला एक छोटी गल्ली आहे.  अचानक एक मुलगा, पतंगाच्या मागे धावत होता, तो कुठून आला हे माहित नव्हते.'

पुढे साजिद म्हणाला, 'जीप फुलस्पीडमध्ये होती. आम्ही लगेचं ब्रेक लावला. सुदैवाने मुलाला काही झालं नाही. पण तो घाबरला. त्यानंतर लगेच हजारो लोकांची गर्दी जमली. आम्ही त्यांनी समजावण्याचा प्रयत्न करत होतो. ही गोष्ट वीरू देवगन यांना कळाली तेव्हा 10 मिनिटांत ते जवळपास 250 फायटर्ससोबत त्याठिकाणी पोहोचले. तेव्हाचा तो सीन एका हिंदी चित्रपटा सारखाचं होता.'