भारती सिंगने आलिया भट्टची सगळ्यांसमोर उडवली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल

कॉमेडियन भारती सिंगला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही.

Updated: Feb 17, 2022, 07:30 PM IST
भारती सिंगने आलिया भट्टची सगळ्यांसमोर उडवली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : कॉमेडियन भारती सिंगला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर तिने लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केलं आहे. ती जेव्हा-जेव्हा पडद्यावर येते तेव्हा लोकं पोट धरुन हसतात. दरम्यान, भारती सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती आलिया भट्टची खिल्ली उडवताना दिसत आहे.

सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे. जिथे स्टार्सशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशा परिस्थितीत, अलीकडेच आलिया भट्टचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जेव्हा ती भारती सिंगच्या शोमध्ये पोहचली होती. आज आलिया भलेही तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने इंडस्ट्रीवर राज्य करत असेल. पण तिच्या फिल्मी करिअरच्या सुरुवातीच्या वेळी तिचं लहान वय लक्षात घेता लोकं तिच्या बोलण्याची खिल्ली उडवायचे. आपल्या विनोदबुद्धीसाठी प्रसिद्ध असलेल्या भारती सिंहने अभिनेत्रीच्या कपड्यांना घेवून लेग पुलिंग केलं आहे हे देखील आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता. यावेळी आलियाने पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचा ए-लाइन फ्रॉक परिधान केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

भारती म्हणाली, 'जेव्हा पांढरा फ्रॉकवर मँगो शेक पडतो  तेव्हा फ्रॉक धुऊन घालावा.' यावर आलिया तिला डफ्फर बोलत म्हणते. 'याचा रंग पिवळा आहे आणि आंबा केशरी रंगाचा असतो.' यानंतर डफ्फर हा शब्द ऐकताच  भारती सिंगने आवाज उठवला, 'आलियाने उत्तर खूप  हुशारीने दिलेलं आहे, यावंर टाळ्या वाजल्याच पाहिजेत.' 

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर चाहतेही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. कॉमेडियन भारती सिंग सध्या तिच्या गर्भधारणेचा आनंद घेत आहे. तर दुसरीकडे आलिया भट्ट तिच्या आगामी 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटामुळे चर्चेत आहे.