IFFI2019 : महानायक, सुपरस्टार एकाच मंचावर एकत्र येतात तेव्हा...

पाहा पुढे काय झालं.... 

Updated: Nov 21, 2019, 02:17 PM IST
IFFI2019  : महानायक, सुपरस्टार एकाच मंचावर एकत्र येतात तेव्हा... title=
IFFI2019

पणजी : भारतीय चित्रपट महोत्सव म्हणजेच IFFI2019  इफ्फी २०१९ला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. बुधवारी गोव्यात या महोत्सवाचा उदघाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. कलासृष्टीतील दोन दिग्गज अभिनेत्यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. हे लाकार होते बिग बी अमिताभ बच्चन  Amitabh Bachchan  आणि थलैवा, सुपरस्टार रजनीकांत Rajnikant. या उदघाटन सोहळ्याच्या वेळी या दोन्ही कलाकारांचा सत्कारही करण्यात आला.  

इफ्फीच्या निमित्ताने देश-विदेशातील मोठमोठे कलाकारही उपस्थित होते. IFFIचं यंदाजंच हे पन्नासावं वर्ष असल्याने या चित्रपट महोत्सवाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. बिग बी आणि रजनीकांत यांच्याव्यतीरिक्त दिग्दर्शक करण जोहर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचीही या सोहळ्याला उपस्थिती होती. 

गायक शंकर महादेवन यांनी आपल्या सुमधूर गायनाने या सोहळ्यात रंगत आणली. आपल्या चित्तथरारक ॲक्शन आणि हटके स्टाइलमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या सुपरस्टार अभिनेते रजनीकांत, यांचाही या समारंभात सत्कार करण्यात आला. तर 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चन यांनाही, भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल गौरवण्यात आलं. 

पन्नासाव्या वर्षात चित्रपटप्रेमींचं लक्ष वेधणारा हा महोत्सव तब्बन नऊ दिवस सुरु असणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या यंदाच्या महोत्सवात तब्बल दोनशे भारतीय आणि परभाषीय (परदेशी) आणि प्रादेशिक चित्रपट पाहण्याची संधी चित्रपट रसिकांना उपलब्ध करून दिली आहे.