भोजपुरी सनी लीयॉनीच्या व्हिडिओ होतोय व्हायरल

आपला चेहरा सनीशी मिळतो अस तिला वाटू लागलं. तेव्हापासून ती सनीला आपलं रोल मॉडेल मानू लागली. 

Updated: May 17, 2018, 01:33 PM IST

नवी दिल्ली : भोजपुरी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी सिंह पूर्णपणे बॉलीवुड अभिनेत्री सनी लियॉनीपासून प्रभावीत झाली आहे. यामुळेच तिला भोजपुरी सनी लियॉनी नावाने ओळखल जातं पल्ली सनीला पूर्णपणे कॉपी करत असते. तिने पल्लवी सिंह हे आपल नाव बदलून सनी सिंह असं ठेवलय. तिचा चेहरा सनीशी मिळताजुळता असल्याचे तिचे भोजपुरी सिनेमातील मित्र नेहमी म्हणत असतात. सध्या इंटरनेटवर तिचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय. भोजपुरी अभिनेता ऋषभ कश्यपच्या 'गोलू' सिनेमातील 'ससुर जी गाण्याचा हा व्हिडिओ आहे. वेब म्युजिकने हा व्हिडिओ अपलोड केला असून त्याला अतापर्यंत १ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. पल्लवीने सनी लियॉनीला २०१२ मध्ये पहिल्यांदा टीव्हीवर पाहिल होतं. आपला चेहरा सनीशी मिळतो अस तिला वाटू लागलं. तेव्हापासून ती सनीला आपलं रोल मॉडेल मानू लागली.