प्रसिद्ध गायकाच्या वडिलांचं निधन, व्यक्त केल्या भावना

आईची परिस्थिती सांगत गायक म्हणाला...  

Updated: Jan 8, 2022, 12:35 PM IST
प्रसिद्ध गायकाच्या वडिलांचं निधन, व्यक्त केल्या भावना title=

मुंबई : संगीतकार आणि गायक विशाल ददलानीच्या वडिलांचं निधन झालं. खुद्द विशालने वडिलांच्या निधनाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. विशालने वडिलांचा फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट म्हणजे विशाल सध्या कोरोनावर उपचार घेत आहे. अशात वडिलांच्या निधनामुळे त्याला मोठा धक्का बसला आहे.  

सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत विशाल म्हणाला, 'शुक्रवारी रात्री, मी माझा सर्वात चांगला मित्र आणि दयाळू व्यक्ती गमावला. मला आयुष्यात त्यांच्यापेक्षा चांगला पिता, चांगला शिक्षक किंवा चांगला माणूस सापडला नसता. माझ्यामध्ये जे काही चांगले आहे ते माझ्या वडिलांचं प्रतिबिंब आहे'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by VISHAL (@vishaldadlani)

विशाल पुढे म्हणाला, 'गेले काही दिवस ते ICU मध्ये होते. पण मला कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे मी त्यांची भेट घेऊ शकलो नाही. मी माझ्या आईला तिच्या कठीण प्रसंगात आधार द्यायलाही जाऊ शकत नाही.... असं पोस्ट करत विशालने त्याच्या भावना व्यक्त केल्या. 

विशाल ददलानीने शुक्रवारीच कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती दिली होती. त्याने इंस्टाग्रामच्या माध्यमातून सांगितले की, त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच त्यांनी संपर्कात आलेल्या सर्व लोकांना त्यांच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहनही त्याने केले.