विशाल भारद्वाज करत आहेत भारताच्या पहिल्या आंतराष्ट्रीय चित्रपटाचे दिग्दर्शन !

चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज आपल्या आगामी चित्रपटाबद्दल खूप उत्साहीत असण्याबरोबर काहीशी भीती देखील त्यांच्या मनात आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 27, 2017, 05:09 PM IST
विशाल भारद्वाज करत आहेत भारताच्या पहिल्या आंतराष्ट्रीय चित्रपटाचे दिग्दर्शन ! title=

नवी दिल्ली : चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज आपल्या आगामी चित्रपटाबद्दल खूप उत्साहीत असण्याबरोबर काहीशी भीती देखील त्यांच्या मनात आहे. कारण ते एका खास चित्रपटवर काम करत आहेत. हा चित्रपट 'जीरो डार्क थर्टी' चा प्रीक्वल असून अल कायदा प्रमुख ओसामा बिन लादेन वर लिहिलेल्या 'द एक्जाइल' या पुस्तकावर आधारित आहे. 

चित्रपटाचे नाव 'ऐबटाबाद' असेल. मात्र ते अजूनतरी निश्चित करण्यात आलेले नाही. या चित्रपटाची कथा तोरा बोरा आणि एब्टाबाद येथे ओसामाने घालवलेल्या  शेवटच्या दिवसांवर आधारित आहे. 

 

याविषयीच्या भावना दिग्दर्शक विशाल यांनी ट्विटरवरून व्यक्त केल्या. ते म्हणाले, "हा विषय माझ्यासाठी नवीन असल्याने त्यावर काम करताना मी उत्साहीत आहे आणि त्याचबरोबर थोडी भीती देखील आहे. कारण ही संस्कृती आणि भाषा माझ्यासाठी सगळ्यात मोठे आव्हान आहे." 
विशाल भारद्वाज आणि जंगली पिक्चर्स सहयोगाने या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट यशस्वीरित्या पूर्ण झाल्यास हा भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट असेल.