Oops.. अदाकारी दाखवता दाखवता नको ते घडलं; सपना चौधरीचा 'तो' Video Viral

Sapna Choudhary Dance Video: सपना चौधरी ही डान्सर कायमच चर्चेत असते. तिचे सगळेच व्हिडीओज हे युट्यूबवर (Sapna Choudhary Trending Videos on You Tube) व्हायरल होत असतात. आपल्या दिलखेचक अदाकारीनं आणि तूफान डान्स परफॉर्मन्सनं तिचे चाहतेही तिचा डान्स शो पाहण्यासाठी तुफान गर्दी करतात.

Updated: Dec 18, 2022, 02:36 PM IST
Oops.. अदाकारी दाखवता दाखवता नको ते घडलं; सपना चौधरीचा 'तो' Video Viral  title=
Sapna Choudhary Dance Video

Sapna Choudhary Dance Video: सपना चौधरी ही डान्सर कायमच चर्चेत असते. तिचे सगळेच व्हिडीओज हे युट्यूबवर (Sapna Choudhary Trending Videos on You Tube) व्हायरल होत असतात. आपल्या दिलखेचक अदाकारीनं आणि तूफान डान्स परफॉर्मन्सनं तिचे चाहतेही तिचा डान्स शो पाहण्यासाठी तुफान गर्दी करतात. सपनाचे स्टेज परफॉर्मन्स खूप जास्त प्रमाणात लोकप्रिय आहेत. तिच्या युट्यूब व्हिडीओजनाही तूफान व्ह्यूज आणि लाईक्स येतात. तिचा कोणताच व्हिडीओ व्हायरल झाला नाही असे नाही. परंतु अनेकदा डान्स करता करता ती उप्स मोमेंट्सचीही शिकार होताना दिसते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे ज्यात तिचा डान्स करता करता तोल गेला आणि पुढं नको तेच घडलं. (viral video sapna choudhary faces oops moments while performing a dance on stage)

सपना चौधरी हल्ली आपल्या डान्स शोजचे फार कमी स्टेज परफॉर्मन्स करताना पाहायला मिळते आहे. अशाच एका जुन्या क्लिपमध्ये सपना चौधरी उप्स मोमेंटची शिकार झालेली पाहायला मिळाली. या व्हिडीओमध्ये सपना पंजाबी ड्रेसमध्ये अदाकारी करताना पाहायला मिळते आहे. त्यातून आपली हीच अदाकारी आपल्या प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह परफॉर्मन्स पोहचवताना तिचा तोल जातो आणि तिचा पाय घसरून ती पडते. ती ओढणी उडते आणि ती उप्स मोमेंटची शिकार होते. हा व्हिडीओ (Oops Moments) सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होतो आहे. 

व्हिडीओच्या सुरुवातीला सपनाला जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की तिच्या नृत्याची एक झलक पाहण्यासाठी लोक वेडे होतात. पण डान्स मूव्ह करत असताना सपनाचा तोल अशा प्रकारे बिघडतो की पुढच्याच क्षणी ती खाली पडताना दिसते आणि सगळीकडे एकच हशा पिकताना दिसतो. पण सपना हार मानत नाही आणि ती लगेच उठते आणि पुन्हा नाचू लागते. हा तिचा जोश पाहून तिचे चाहते तिच्यावर कौतुकाचे वर्षाव करतात. 

पाहा व्हिडीओ - 

सपना चौधरी ही बिग बॉसमध्ये होती. ती अनेक रिएलिटी शोज गाजवले आहेत. तिच्या शोला मोठे मोठे लोकंही येत असतात. सध्या तिची इंटरनेटवर एकच चर्चा आहे. हरियाणवी गाण्यांचे नाव काढले तर सपना चौधरीचे नाव आपोआपच प्रत्येकाच्या मनात येते. सपनाची 'तेरी आंखियांची यो काजल' (Teri Akhiyon ka Kajal) आणि 'गजबन पानी' ही गाणी प्रसिद्ध आहेत. सपनाचा नृत्यांगना ते अभिनेत्री होण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास आव्हानांनी भरलेला आहे पण तिने कधीही हार मानली नाही आणि तिला जे काही करायचे होते ते साध्य केले.