'झीरो'च्या ट्रेलरनंतर सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल

हा चित्रपट नक्कीच काहीतरी वेगळा असणार अशी आशा त्याच्या चाहत्यांना होती.

Updated: Nov 3, 2018, 03:47 PM IST
'झीरो'च्या ट्रेलरनंतर सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल title=

मुंबई: बॉलीवुडचा बादशाह शाहरूख खानच्या वाढदिवसालाच त्याच्या आगामी सिनेमा 'झिरो'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. 'झीरो' मधला स्वत:चा पहिला लूक शाहरुखने काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित केला होता. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच काहीतरी वेगळा असणार अशी आशा त्याच्या चाहत्यांना होती. चित्रपटाचा ट्रेलर या अपेक्षा पूर्ण करतो. शाहरुख खानने या चित्रपटात एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. त्याचा हा लूक आणि ट्रेलरमधील भन्नाट संवादांमुळे सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.