मुंबई : अभिनेता फरहान अख्तरचं खाजगी आयुष्य कायमच चर्चेत राहिलं आहे. 2017 मध्ये फरहानने पत्नी अधुना अख्तरला घटस्फोट दिला. यानंतर फरहान अख्तरचं नाव अँकर शिबानी दांडेकरसोबत जोडलं गेलं. असं असतानाच शिबानीने एक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. आणि या फोटोनंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
या फोटोत शिबानीने एका व्यक्तीचा हात धरला आहे. या व्यक्तीचा हात धरून ती सगळा प्रवास करत असल्याचं दिसत आहे. पण या फोटोत त्या व्यक्तीचा फोटो दिसत नाही. शिबानी मात्र या फोटोकडे वळून पाहताना दिसत आहे. असं असताना हा फोटो फरहान अख्तरचा असल्याचं म्हटलं जात आहे.
शिबानी आणि फरहान लवकरच आपल्या नात्याची ऑफिशिअल अनाऊन्सटमेंट करणार असल्याचं म्हटलं जात आहे. शिबानीने इंडियन प्रिमिअर लीगचं अँकरिंग केल्यानंतर ती अधिक लोकप्रिय झाल्याचं म्हटलं जात आहे.