1981 साली राहुल रवैल यांनी 'लव स्टोरी' हा सिनेमा तयार केला आहे. या सिनेमात विजयता पंडित आणि कुमार गौरव ही जोडी प्रेक्षकांसमोर आली होती. या सिनेमाच्या सेटवरच दोघं प्रेमात पडले. पण या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि एका काँट्रोवर्सीमुळे नात्यात दुरावा निर्माण झाला. कित्येक वर्षांनंतर विजयता पंडितने आपला को-स्टार कुमार गौरवसोबतच्या नात्याबद्दलचा खुलासा केला आहे. एवढंच नव्हे तर तिने आपली लवलाइफ, कुमार गौरवचा मोडलेला साखरपुडा धोका आणि संजय दत्तच्या बहिणीसोबतच लग्न या सगळ्याबद्दच सविस्तर सांगितलं आहे.
विजयता पंडित यांनी सांगितलं की, कुमार गौरव आणि ती कसे एकमेकांच्या जवळ आले. आणि कशामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. विजयताने सांगितलं की, बंटी म्हणजे कुमार गौरव हा पहिला मुलगा आहे ज्याला 'लव स्टोरी' च्या शुटिंग दरम्यान पहिल्यांदा मिठी मारली होती. तुम्ही कोणतीही लव्हस्टोरी बघा, ऋषी कपूर-डिंपल कपाडिया यांचा 'बॉबी', सनी देओल-अमृता सिंह यांचा 'बेताब', संजय दत्त आणि टीना मुनीम यांचा 'रॉकी', हे सर्व कलाकार खऱ्या आयुष्यात प्रेमात पडले. सिनेमांमध्ये प्रेमाला अनुभवायचं असतं तरच तो अभिनय सिनेमात दिसून येतो. 'लव स्टोरी' सिनेमाच्या निमित्ताने मला कुणी तरी पहिल्यांदा स्पर्श केला होता. यामुळेच आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो. बंटीला मी खूप आवडायचे. तो माझा हात पकडून माझ्यासोबत फिरायचा. त्या काळातील तो अतिशय आकर्षक मुलगा होता.
विजयताने सांगितलं की, गौरवचे वडिल त्यांच्या नात्याच्या विरोधात होते. एवढंच नव्हे तर दारू पिऊन त्यांनी बंटीला सांगितले की, तू माझा राजकुमार आहेस आणि तुला राजकुमारीशीच लग्न करायला हवं. ते आपल्या मुलासाठी एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगी पाहत आहेत. मी हे ऐकून फार घाबरले होते. पण बंटी कायमच तिला सांगायचा की, तो माझ्यावर प्रेम करतो. ते दोघं एकमेकांसोबत बसून दारू प्यायचे आणि वाद घालायचे. मी या स्थितीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे.
राज कपूर यांच्या मुलीसोबत साखरपुडा करुनही कुमार गौरव फक्त विजयतालाच लग्नाचा शब्द देत होते. एवढंच नव्हे तर त्यांची शपथ देखील घेतली होती. विजयताने सांगितलं की, राजेंद्र कुमार यांना दिसत होतं की, मुलगा माझ्या प्रेमात पडत आहे. त्यामुळेच त्यांनी राज कपूर यांची मुलगी रीमासोबत कुमार गौरवचा साखरपुडा केला. मी त्या साखरपुड्याच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहिले. मी तो सोहळा पाहिला. पण साखरपुड्यानंतरही बंटी माझ्या घरी येतच राहिला पण मी त्याच्या घरी कधीच गेली नाही.
विजयताने सांगितलं की, कुमार गौरव आणि रीमा यांचा साखरपुडा तुटण्याला मी जबाबदार नाही. या घटनेनंतर माझे आई-वडील खूप चिंतेत होते. एवढंच नव्हे तर विजय यांनी म्हटलं की, राजेंद्र कुमार यांना ते सांगणार आहे की, यापुढे काळजी घ्या तुमचा मुलगा इथे पुन्हा येणार नाही. कारण याचा साखरपुडा झालेला आहे. बंटीने विजयताच्या आईला सांगितलं की, माझा साखरपुडा झाला असला तरीही मी लग्न केलं तरी विजयताशीच लग्न करणार आहे. एवढंच नव्हे तर बंटीने सांगितलं की, तो लग्न माझ्याशीच करणार आहे. पण नेमकं काय झालं हे मला कळत नाही. एवढंच नव्हे तर त्याचं नाव नम्रता दत्तसोबतही जोडलं गेलं. एवढंच नव्हे तर यानंतर त्याने रीमासोबतचा साखरपुडा मोडला. यामध्ये माझा काहीच हेतू नव्हता.
कुमार गौरव आणि विजयताने 'लव स्टोरी' या सिनेमात एकत्र काम केलं आहे. हा सिनेमा अतिशय हिट ठरला एवढंच नव्हे तर हे दोघं एका रात्रीत स्टार बनले. येथेच त्यांच्या नात्याची सुरुवात झाली. विजयताने दिवंगत संगीतकार आदेश श्रीवास्तव यांच्याशी लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत तर कुमार गौरवने संजय दत्तची बहिण नम्रताशी लग्न केलं आणि त्यांना दोन मुलं आहेत.