मुंबई: अभिनेत्री सोनम कपूर आणि अभिनेता राजकुमार राव स्टारर सिनेमा 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' शुक्रवारी प्रदर्शित झाला. सिनेमाला समीक्षकांनी आणि दर्शकांनी चांगल्याच प्रतिक्रीया दिल्या. पहिल्याच दिवशी सिनेमाने 5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर ट्रेड एक्सपर्टच्या सांगण्यानुसार सिनेमा दुसऱ्या दिवशी 8 कोटींपर्यंत मजल मारु शकतो. 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' सिनेमा समलैंगिक संबंधांवर आधारित असून सिनेमात अनिल कपूर आणि सोनम कपूर वडील-मुलीची भूमिका साकारताना दिसत आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन शैली चोप्रा धर यांनी केले आहे. सिनेमात जूही चावला मुख्य भूमिका बजावताना दिसत आहे. सोशल मीडियावर सिनेमाला चाहत्यांकडून चांगलीच दाद मिळत आहे. विशेष: सोनमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सिनेमावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या प्रतिक्रीया मांडत आहेत. 'सिनेमा खूपच छान आहे. प्रेमाला समजण्यासाठी काय आवश्यक आहे हे या सिनेमात अत्यंत उत्कृष्ट पणे मांडले आहे'. आणखी एका चाहत्याने सिनेमाचे कौतुक करत 'मी अजुनही सिनेमाचाच विचार करत आहे. सोनम कपूर मला तुमचा गर्व आहे, डोळ्यात पाणी येईल असा हा सनेमा आहे...'
चाहते एवढ्यावरच थांबले नाही एका चाहत्याने तर सिनेमागृहात व्हिडिओ काढून शेअर केला, प्रत्येक सिनेमा हा मनाला स्पर्श करणारा नसतो पण 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' सिनेमाने चाहत्यांना भावूक केले.