विधू विनोद चोप्रा यांनी अमिताभ बच्चन यांना भेट म्हणून दिलेली ती ''साडेतीन कोटी''ची कार का विकली?, जाणून घ्या कारण

दिलदार विधू विनोद चोप्रा हे अमिताभ बच्चन यांच्या अभिनयावर खूश झाले आणि त्यांना लक्झरी 'रॉल्‍स रॉयस फँटम' ही कार भेट दिली

Updated: Apr 22, 2021, 09:57 PM IST
विधू विनोद चोप्रा यांनी अमिताभ बच्चन यांना  भेट म्हणून दिलेली ती ''साडेतीन कोटी''ची कार का विकली?, जाणून घ्या कारण title=

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचं नाव भारतातचं नाही तर भारता बाहेरही प्रसिद्ध आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी विधू विनोद चोप्रा यांच्या सिनेमांत काम केलं आहे. दिलदार असलेल्या विधू विनोद चोप्रा यांनी अमिताभ बच्चन यांच्या अभिनयावर खूश झाले आणि त्यांना लक्झरी 'रॉल्‍स रॉयस फँटम' ही कार भेट दिली. मात्र ही कार अमिताभ बच्चन यांनी काही काळानंतर विकली. अखेर अमिताभ बच्चन यांनी असे का केले? जाणून घेऊया.

बॉलिवूडचा टॅलेंटेड माणूस म्हणून प्रसिद्ध झालेल्या विधू विनोद चोप्रा यांचा जन्म 5 सप्टेंबर रोजी 1952 मध्ये श्रीनगर येथे झाला. ३ इडियट्स, मुन्ना भाई, पीके, आणि संजू सारख्या ब्लॉकबर्स्टर चित्रपटांची निर्मिती करून आपला कौशल्य त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलं आहे. एक चांगली व्यक्ती असण्याबरोबरच त्यांना 'विधु दिलदार' असंही म्हणतात. विधू यांनी 2007 मध्ये एकलव्य चित्रपट बनविला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, विद्या बालन, सैफ अली खान, शर्मिला टागोर, संजय दत्त, बोमन इराणी यांनी भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी पाठवला गेला होता.

एकलव्य चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा अभिनय पाहून विधू विनोद चोप्रा यांनी त्यांना लक्झरी 'रॉल्‍स रॉयस फँटम' कार दिली. वृत्तानुसार त्यावेळची या कारची किंमत साडेतीन कोटी होती. अमिताभ बच्चन यांनी ही कार गिफ्ट दिल्याबद्दल आनंद व्यक्त करत विधुंचे आभार मानले. मीडिया रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन यांनी भेटवस्तू म्हणून दिलेली ही लक्झरी कार काही महिन्यांनंतर एका व्यावसायिकाला विकली. अमिताभ यांनी कार विक्रीचं कोणतेही कारण अधिकृतपणे सांगितलं नाही.

अमिताभ यांना गिफ्ट मिळालेल्या 'रॉल्‍स रॉयस फँटम' कारच्या सहाव्या सिरिजला 2003 मध्ये कंपनीने लाँच केलं. कंपनीने 2017 मध्ये ही कार विक्री बंद केली. त्यावेळी देशातील सर्वात महागडी मर्सिडीज लक्झरी एमपीव्ही मॉडेल कारही अमिताभ बच्चन यांना खरेदी करायची होती. अशा परिस्थितीत दोन गाड्या एकावेळी चालवणं शक्य नव्हतं. आणि म्हणूनच त्यांनी विधू विनोद चोप्रा यांनी भेटवस्तूमध्ये दिलेली 'रॉल्‍स रॉयस फँटम' असावी असा अंदाज बाधण्यात आला.