Video : नवऱ्याच्या कॉन्सर्टला पोहोचली प्रियंका चोप्रा; लेकीला पाहताच निक जोनसने असं काही केलं की...

Malti Marie At Nick Jonas Concert : नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांची मुलगी मालती मेरी जोनास हिनेही कॉन्सर्टला हजेरी लावली. आपल्या वडिलांना परफॉर्म करताना पाहून मालती मेरी जोनासला आनंद झाला.

Updated: Oct 14, 2023, 11:24 PM IST
Video : नवऱ्याच्या कॉन्सर्टला पोहोचली प्रियंका चोप्रा; लेकीला पाहताच निक जोनसने असं काही केलं की... title=
Malti Marie At Nick Jonas Concert, Priyanka Chopra Daughter Video

Priyanka Chopra Daughter Video : बॉलिवूडची सुपरस्टार प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्येही तिच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखली जाते. हॉलिवूड सुपरस्टार निक जोनाससोबत (Nick Jonas) लग्न केल्यानंतर प्रियांका लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात प्रियांका चोप्रा सरोगसीच्या मदतीने मुलगी मालती मेरी चोप्राची (Malti Marie) आई झाली होती. त्यानंतर ती आपल्या मुलीचे विविध फोटो शेअर करताना दिसते. अशातच आता प्रियंका चोप्राच्या लेकीचा एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर तुफान शेअर होत आहे. वडिलांना परफॉर्म करताना पाहून मालती मेरी ज्या निरागस भावना व्यक्त केल्या त्याचा हा व्हिडीओ अनेकांनी पसंत केलाय.

अमेरिकेत निक जोनासची (Nick Jonas concert) क्रेझ चांगलीच आहे. तो स्टेज शो करतो आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी लाखोंची गर्दी उसळते. पत्नी प्रियांका चोप्रा नेहमी त्यांच्या कॉन्सर्टला हजेरी लावते. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांची मुलगी मालती मेरी जोनास हिनेही कॉन्सर्टला हजेरी लावली. आपल्या वडिलांना परफॉर्म करताना पाहून मालती मेरी जोनासला आनंद झाला. तर प्रेक्षकांप्रमाणे मालती जोनासनेही खूप टाळ्या वाजवल्या आणि तिच्या वडिलांना गाताना आणि नाचताना पाहण्याचा आनंद घेतला. सोशल मीडियावर Jerry X mimi नावाच्या इंस्टाग्राम हँडलने हा व्हिडिओ शेअर केलाय. 

तुफान ट्रेंडिंगमध्ये असलेल्या या व्हिडिओमध्ये मालती स्टेजवर उभी राहून वडिलांकडे जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यावेळी प्रियांकाने तिला धरलं. प्रियांका चोप्रा जोनास कुटुंबातील अनेकांनी तिच्या शोला हजेरी लावली होती. सध्या प्रियांका चोप्रा आपल्या कुटुंबासह आनंदी असल्याचं पहायला मिळतंय.

पाहा Video

दरम्यान, अलीकडेच प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी त्यांच्या छोट्या मालतीचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. प्रियंका चोप्रा अनेकदा तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर मुलगी मालती मेरी चोप्राचे फोटो शेअर करते.