Video: का तूफान व्हायरल होतेय 'मसाला चहा' बनवणारी सेलिब्रिटी ?

हाच चहा जेव्हा अतिशय खास अंदाजात आपल्यासमोर येतो, तेव्हा...

Updated: Nov 19, 2021, 12:09 PM IST
Video: का तूफान व्हायरल होतेय 'मसाला चहा' बनवणारी सेलिब्रिटी ? title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : भारतीयांसाठी चहा नेमका किती प्रिय आहे, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण, हाच चहा जेव्हा अतिशय खास अंदाजात आपल्यासमोर येतो, तेव्हा मात्र चहाचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित होतो.

सध्या असाच एक खास चहाचा प्याला सर्वांसमोर आला आहे. हा प्याला खास असण्याचं कारण म्हणजे चहा बनवणारी व्यक्ती.

एचबीओ मॅक्सचा शो, 'सेलेना + शेफ'च्या एका नव्या भागामध्ये लोकप्रिय सेलिब्रिटी सेलेना गोमेज हिनं मास्टर शेफच्या मदतीनं खास असा मसाला चहा बनवला.

परदेशी सेलेनाला भारतीय खाद्यपदार्थ इतक्या आवडीनं बनवताना पाहून फार आनंद झाला. फक्त चहा बनवणंच नव्हे, तर सेलेनानं पहिल्य़ांदाच याचहाची चवही चाखली आणि ती अवाक् झाली.

एका फॅन अकाऊंटवरुन अपलोड करण्यात आलेल्या सेलेनाच्या या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

सेलेनानं कसा बनवला मसाला चहा?
मास्टर शेफ पद्मा लक्ष्मीनं सांगितल्यानुसार सेलेनानं सर्वप्रथम आल्याचे तुकडे करुन ते उकळत्या पाण्यात टाकले. ज्यानंतर तिनं 3 चमचेचहा पावडर पाण्यात टाकून मिश्रण हलवलं.

पुढे यामध्ये 4 लवंग, अर्था चमचा वेलची पूड, 3 चमचे ब्राऊन शुगर आणि हलकं मधही मिसळलं. गाळणीनं हे चहा आणि दुधाचं मिश्रण त्यांनी एका कपमध्ये ओतून घेतलं.