थुकरटवाडीत संग्राम भालेराव येतो तेव्हा...

पाहा धमाकेदार व्हिडिओ

थुकरटवाडीत संग्राम भालेराव येतो तेव्हा...  title=

मुंबई : दिवसेंदिवस बॉलिवूडकरांना मराठी सिनेसृष्टी आणि कार्यक्रम आकर्षित करताना दिसत आहे. असाच मराठीतील एक शो म्हणजे झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'. या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत अनेक बॉलिवूड दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावून हसण्याचा मनमुराद आनंद लुटला आहे. 

आता लवकरच या कार्यक्रमात पेशवा बाजीराव, अल्लाउद्दीन खिलजी आणि सिंबा भालेराव हे कॅरेक्टर साकारलेला अभिनेता रणवीर सिंह येणार आहे. झी मराठीने आपल्या फेसबुक पेजवर याचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. 

रणवीर सिंहने आतापर्यंत साकारलेली सगळीच पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्याच्या कामातील एनर्जी कायमच कौतुकास्पद असते. हीच एनर्जी घेऊन रणवीर सिंह दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत 'सिंबा' या सिनेमात दिसणार आहे. 

या सिनेमात रणवीरने संग्राम (सिंबा) भालेरावची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत या सिनेमात सारा अली खान देखील दिसणार आहे. तसेच अनेक मराठी कलाकारांची मांदियाळी या सिनेमात आहे. 

थुकरटवाडीत रणवीरने आपला जलवा दाखवला आहे. 'रामलीला' सिनेमातील गाण्यावर रणवीर नाचताना दिसतो. त्याचप्रमाणे दुसऱ्या व्हिडीओत तो 'पद्मावत' सिनेमातील हबीबी आणि 'सिंबा' सिनेमातील गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘लवकरच भेटूया सिंबाला थुकरटवाडीत’ असं लिहीण्यात आलं आहे.

 त्यामुळे लवकरच रणवीरसहीत सिनेमाची संपूर्ण टीम 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर दिसू शकते. हा सिनेमा 28 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दीपिका पदुकोणशी लग्न केल्यानंतर रणवीर सिंहचा हा पहिला सिनेमा आहे. 

 

ट्रेलरमधील सीन आणि डायलॉग तुम्हाला 'सिंघम'ची आठवण करून देईल. पण रणवीर या सिनेमात एका घुसखोर पोलीसाच्या भूमिकेत दिसत आहे. सिनेमात 'हे कलयुग आहे कलयुग... इथे लोक फक्त आपल्या स्वार्थासाठी जगतात. हा डायलॉग रणवीरने अतिशय मस्त म्हटला आहे.