Viral Video: करीना कपूरचा कपिल शर्माला लैंगिक संबंधावर सवाल; म्हणाला, 'दोन मुलं...'

'वॉट वूमन वॉन्ट'मुळे करिना कपूर खान सध्या जोरदार चर्चेत आहे. या शोमध्ये कपिल त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहचला होता. कपिल बॉलिवूड स्टार करीना कपूरच्या 'व्हॉट वुमन वॉन्ट' या चॅट शोमध्ये दिसणार आहे. 

Updated: Mar 21, 2023, 08:14 PM IST
Viral Video: करीना कपूरचा कपिल शर्माला लैंगिक संबंधावर सवाल; म्हणाला, 'दोन मुलं...' title=

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माचा झ्विगाटो हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. लोकांची या चित्रपटाला चांगलीच पसंती मिळत आहे दरम्यान, कपिल बॉलिवूड स्टार करीना कपूरच्या 'व्हॉट वुमन वॉन्ट' या चॅट शोमध्ये दिसणार आहे. नुकताच या शोचा प्रोमो रिलीज झाला आहे. जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाहीये.

'वॉट वूमन वॉन्ट'मुळे करिना कपूर खान सध्या जोरदार चर्चेत आहे. तिच्या शोमध्ये रोज नवनवीन सेलिब्रिटी येत असतात. हा शो प्रेक्षकांच्याही चांगलाच पसंतीस उतरल्याचं दिसत आहे. या शोचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये करीना कपिलसोबत चर्चा करताना दिसणार आहे. करिना आणि कपिलचा हा रंजक संवाद सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

'वॉट वूमन वॉन्ट' या शोमध्ये कपिल त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहचला होता. कपिल शर्मा सध्या  त्याच्या ज्विगाटो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रोमोमध्ये करीना कपूरचे प्रश्न जितके मजेदार आहेत, तितकीच कपिल शर्माची उत्तरेही धमाल आहेत.

जेव्हा करिना कपूरने कपिल शर्माला त्याने रात्री उशिरा केलेल्या वादग्रस्त ट्वीटमबद्दल विचारलं तेव्हा  कपिल म्हणाला, "मी ट्विटरच्या उडणाऱ्या पक्षाला कधी भेटलो तर नाही, पण त्याने माझी झोप मात्र चांगलीच उडवली आहे." करीना कपूरने कपिल शर्माला विचारलं की, आम्ही कपिल शर्माची मजेदार बाजू पाहिली आहे, तूही तितकाच रोमँटिक आहेस का? यावर कपिल शर्माने मजेशीर उत्तर दिलं आणि म्हणाला, ''मला दोन मुलं आहेत''.  मी रोमँन्टिक नसतो तर दोन मुल अशीच डाऊनलोड नसती केली. नाही का?' कपिलचं हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळेच आश्चर्यचकित झाले. 

अशाप्रकारे कपिल शर्माने करीना कपूरला हे उत्तर देऊन आश्चर्यचकित केले आहे. या चित्रपटात कपिल शर्मासोबत शहाना गोस्वामी मुख्य भूमिकेत आहे. कपिल शर्माच्या झ्विगाटोचे बजेट जवळपास 10 कोटी रुपये आहे. झ्विगाटो चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नंदिता दास यांनी केलं आहे.  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे अडीच कोटींचा व्यवसाय आत्तापर्यंत केला आहे. चित्रपटाच्या कथेला खूप पसंती दिली जात आहे.