जीवन एक संघर्ष... वडील मृत्यूच्या दारात असताना दिग्गज अभिनेत्यावर अंडापाव विकण्याची वेळ

ते अनेकदा आपल्या संघर्ष सगळ्यांसमोर सांगत असतात. 

Updated: Oct 6, 2022, 07:40 PM IST
जीवन एक संघर्ष... वडील मृत्यूच्या दारात असताना  दिग्गज अभिनेत्यावर अंडापाव विकण्याची वेळ title=

Sanjay Mishra Struggle Story: बॉलीवूडमध्ये आजकाल अनेक कलाकार अभिनयासोबतच इतर कामंही करताना दिसत आहेत. यातून ते आपला रोजगारही करतात. काहींना नाईलाजास्तव अभिनयासोबतच दुसरं काम स्विकारावं लागतं किंवा काळाची गरज म्हणून काहीजण मल्टिटास्किंग (Bollywood Celebrity) करण्यावर भर देतात. परंतु बॉलीवूडमधला असाच एक दिग्गज कलाकार आहे ज्यात ग्लॅमर, लक्झरी, प्रसिद्धी आणि पैसा पाहूनही ढाब्यामध्ये अंडापाव विकायला सुरूवात केली होती. (vetern bollywood actor struggles to work in a dhaba after his father illness photo goes viral)

हा दिग्गज अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ते आहेत अभिनेते संजय मिश्रा (Bollywood Actor Sanjay Mishra). आज 6 ऑक्टोबर रोजी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक असणाऱ्या संजय मिश्रा यांचा वाढदिवस (Sanjay Mishra Birthday) आहे. संजय मिश्रा हे केवळ त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठीच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारांमुळेही ओळखले जातात. 

ते अनेकदा आपल्या संघर्ष सगळ्यांसमोर सांगत असतात. असाच एक संजय यांचा किस्सा खूप चर्चेत आला होता. संजय यांच्या आयुष्यात एक असा टप्पा आला जेव्हा ते सर्व काही सोडून डोंगरावर गेले होते आणि एका ढाब्यावर काम करू लागले होते. (Sanjay Mishra Working in Dhaba) त्यांच्या आयुष्यात असे काय घडले की या प्रतिभावान अभिनेत्यावर चक्क ढाब्यावर काम करण्याची वेळ आली होती, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. 

आणखी वाचा - 'पार्टीत शाहरूख खानच्या तशा वागण्यामुळं आम्हाला रस्त्यावरच...' रितेश देशमुखच्या वक्तव्यावरून एकच खळबळ

एक काळ असा आला होता जेव्हा संजय यांची तब्येत प्रचंड खालावली होती. त्यांच्या पोटात संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती. ती इतकी बिघडली होती की ते अंथरूणातून उठूच शकत नव्हते. या दरम्यान संजय आपल्या वडिलांसोबत (Sanjay Mishra Father) राहू लागले होते. त्यानंतर संजय बरे तर झाले पण त्याच्या वडिलांवर मात्र काळानं घात केला. काही दिवसांतच त्यांच्या वडिलांचे निधन (Sanjay Mishra Father Death) झाले. 

आपल्या वडिलांचा मृत्यू डोळ्यांसमोर पाहून ते खूपच खचून गेले होते असा अनुभव त्यांनी स्वतःहूनच सांगितला होता. वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर संजय मिश्रा यांना मुंबईला परत जायचे नव्हते त्यामुळे मृत्यूला इतक्या जवळून पाहिलेल्या संजय यांनी थेट डोंगरावर जाऊन येथील गंगोत्रीजवळील (Gangotri) ढाब्यावर काम करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा  - 'हर हर महादेव' चित्रपटातील भुमिकेबद्दल अभिनेता सुबोध भावेचा मोठा निर्णय

स्वत: संजय यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मला असे वाटू लागायचे की जेव्हा आयुष्यात काही असं घडतं तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात अजून काहीतरी करू वाटते. या ढाब्यावर काम करत असताना अनेकांनी संजयला ओळखलेही होते. या घटनेनंतर संजय मिश्रा यांनी रोहित शेट्टीच्या 'ऑल द बेस्ट' (All the Best) चित्रपटातून मग कमबॅक केलं.