Veere Di Wedding : ''लाज शरम'' नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

करिना कपूरचा हटके अंदाज 

Veere Di Wedding : ''लाज शरम'' नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, सोनम कपूर, शिखा तल्सानिया आणि स्वरा भास्करचा 'वीरे दी वेडिंग' हा सिनेमा 1 जून रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाची टीम आपल्या प्रमोशनमध्ये लागली आहे. नुकतच या सिनेमाचं 'लाज शरम' हे नवं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याला मुलींना जास्त पसंत केलं आहे. या गाण्याला मुख्य करून करिना कपूरवर चित्रित केलं आहे. 

कायम मुली आपल्या शॉपिंगसाठी लोकप्रिय असतात. आणि मुलींना खुश बघायचं असेल तर त्यांना शॉपिंगसाठी पाठवा ही गोष्ट अगदी जगजाहीर आहे. मात्र या गाण्यात करीना कपूर शॉपिंग करताना त्रासली असल्याचं दिसत आहे. कारण शॉपिंग करताना तिच्या डोक्यात एवढंच आहे की, लग्नानंतर आपल्याला अशी मजा करता येणार नाही. सिनेमातील या गाण्याला दिव्या कुमार आणि जसलीन रॉयल यांनी गाणं गायलं आहे. तर याचे लिरिक्स व्हाइट नोइसने लिहिलं आहे. 

मे महिन्यात या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये करीना, सोनम, शिखा आणि स्वरा यांच्या फ्रेंडशीपची बाँड असल्याच दिसतंय.