Veena Jagtap : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगताप ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. वीणा जगतापच्या पोस्ट या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत येतात. वीणानं खरंतर तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. वीणाला 'राधा प्रेमरंगी रंगली' या मालिकेमुळे लोक ओळखू लागले होते. पण वीणा जगतापला खरी लोकप्रियता ही 'बिग बॉस मराठी 3' मधून मिळाली. त्याच कारण म्हणजे तिचं आणि शिव ठाकरेचं नाव सतत एकत्र घेतलं जात होतं. इतकंच नाही तर त्यांच्याविषयी अनेक चर्चा होत होत्या. पण त्यांच्यात काही बिनसल्यानं त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. दरम्यान, आता वीणा जगताप चर्चेत येण्याचे कारण वेगळंच आहे. वीणाचं मॅट्रिमोनियल साइटवर एक फेक अकाऊंट बनवलं. त्याविषयी सांगत वीणानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
वीणानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये वीणा जगतापनं मॅट्रिमोनियल साईटवर तिच्या नावाच्या असलेल्या या फेक अकाऊंटचा स्क्रिन शॉर्ट शेअर केला आहे. हा स्क्रिनशॉर्ट शेअर करत वीणानं कॅप्शन देत म्हणाली की, "मला नुकतंच एका चाहत्याने हा स्क्रीनशॉट शेअर केला आणि हे पाहिल्यानंतर मला धक्का बसला. मला अजिबात कळत नाही की माणसं असं का करतात? मेट्रोमोनियल साईटवरही खोटी माहिती. विशेष म्हणजे मी सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहे याची मलाही कल्पना नाही. मी कधीच कोणत्याही मेट्रोमोनियल साईटवर नव्हते आणि नसेन. मी गेल्यावर्षीदेखील अशाचप्रकारे खोटी बातमी ऐकली होती. त्यामुळे अशा खोट्या प्रोफाईलपासून सावध राहा. पण काहीही म्हणा, हे प्रोफाईल बनवणाऱ्या व्यक्तीच्या हिंमतीची मला दाद द्यावीशी वाटते”.
हेही वाचा : प्रत्येक पुणेकराला अभिमान वाटेल अशी बातमी! Shah Rukh Khan च्या 'जवान'चं पुणे कनेक्शन ठाऊक आहे का?
वीणानं 2018 साली प्रदर्शित झालेल्या 'व्हॉट्स अॅप लग्न' या चित्रपटात तिनं काम केलं. त्याशिवाय तिनं 'ठिपक्यांची रांगोळी' या चित्रपटातही काम केलं आहे. वीणाच्या शिक्षणाविषयी बोलायचं झालं तर तिनं काही दिवसांपूर्वीच मेकअप आर्टिस्ट म्हणून पदवी मिळवली आहे. वीणाचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. तर वीणाच्या फॉलोवर्स विषयी बोलायचे झाले तर इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे 461K चाहते आहेत.