ब्रेकअप झालंय, हसतायं काय? अभिनेता कोणावर संतापला...

वरुण सूद आणि दिव्या अग्रवाल यांचे ब्रेकअप झाले आहे

Updated: Mar 11, 2022, 03:27 PM IST
 ब्रेकअप झालंय, हसतायं काय? अभिनेता कोणावर संतापला... title=

मुंबई : वरुण सूद आणि दिव्या अग्रवाल यांचे ब्रेकअप झाले आहे. दिव्याने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे. मात्र तेव्हापासून दिव्या आणि वरुण सतत चर्चेत आहेत.सोशल मीडियावर वरुणला ट्रोल केले जात आहे.

ट्रोलर्सला असे वाटत आहे की, वरुणमुळेच दिव्याने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, तर काही नेटकऱ्यांनी त्यांच्या ब्रेकअपचे कारण वरुणची मैत्रीण मधुरिमा रॉय ही असल्याचं ही म्हटलं आहे.

मात्र, या मुद्द्यावर बोलताना दिव्याने आधीच पोस्ट शेअर करत वरुणचाही बचाव केला. आता वरुण सूदने सुद्धा या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आहे. त्याला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की," एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा आम्हाला आमचा वेळ दिला तर बरं होईल... "

वरुणने ट्विट करून लिहिले, हॅलो, सर्वांना एवढेच सांगायचे आहे की लोकांना श्वास घेऊ द्या. जर दोन व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल गप्प असतील तर ते काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

कुणाला उगीचच दोष देण्याचा हा खेळ सोडून द्या. कृपया आम्हाला आमचा वेळ द्या.' वरुणने ट्विट करण्यापूर्वी दिव्याने ही पोस्ट शेअर केली होती. तिने ब्रेकअप झाल्याची माहिती दिली होती.