VIDEO : 'करण जोहर घरात फूट पाडतो', वरुण धवनचा दिग्दर्शकावर गंभीर आरोप

Koffee with karan 8 varun dhawan : 'कॉफी विथ करण' या शोमध्ये वरुण धवननं हजेरी लावली यावेळी त्यानं करणवर चक्क एक आरोप केला असून 'तो घरात फूड पाडतो', असं म्हटलं आहे.

दिक्षा पाटील | Updated: Nov 20, 2023, 12:33 PM IST
VIDEO : 'करण जोहर घरात फूट पाडतो', वरुण धवनचा दिग्दर्शकावर गंभीर आरोप title=
(Photo Credit : Social Media)

Koffee with karan 8 varun dhawan : बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर हा त्याच्या कॉफी विथ करण या शोमुळे सध्या चर्चेत आहे. या शोचं आठवं पर्व सुरु आहे. आता पर्यंत या शोचे चार एपिसोड झाले आहेत. हे चारही एपिसोड मजेशीर होते. पण आता करण जोहरच्या आगामी एपिसोडच्या गेस्ट लिस्टच्या एपिसोडमधील एक-एक क्लिप घेत व्हिडीओ बनवला आहे. या प्रोमोमुळे प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढली आहे. करण जोहरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत सगळे सेलिब्रिटी आपल्याला पाहायला मिळतात. त्यात शोमध्ये पुढे येणारे सेलिब्रिटी जान्हवी कपूर, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा आडवाणी, विक्की कौशल, अजय देवगण, काजोल आणि राणी मुखर्जी दिसत आहेत. 

Koffee With Karan 8 च्या वरुण धवन पासून करणचे सगळे सेलिब्रिटी त्याला ट्रोल करताना दिसतात. वरुण धवन बोलताना दिसतो की हा धर्माचा हीरो आहे. खूप नाजूक आहे. त्यानंतर करण जोहरला घर तोडण्यासाठी जबाबदार असल्याचं म्हटलं. त्यावर करण म्हणतो की गप्प बस, मी हे सहन करू शकत नाही. त्यानंतर करण जोहरनं सिद्धार्थ मल्होत्राला प्रश्न विचारलेल्या प्रश्नावर अभिनेता असं उत्तर देतो की करण काही बोलूच शकत नाही. याशिवाय जान्हवी बोलताना दिसते की हाच तुझ्या चित्रपटातील सेंटर पॉइंट आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्या प्रोमोत करीना आणि आलिया हे करण जोहरची मस्करी करताना दिसतात. सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे 'कॉफी विद करण 8' मध्ये रोहित शेट्टी आणि अजय देवगण हे दोघे देखील दिसत आहेत. तर काजोल आणि रानी मुखर्जी एकत्र आल्याचे दिसते. त्या दोघी देखील करण जोहरची खिल्ली उडवताना दिसतात. त्यामुळे या सगळ्या कलाकारांना शोमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 

हेही वाचा : भारताच्या पराभवानंतर अमिताभ बच्चन ट्रोलर्सच्या निशाण्यावर म्हणाले, 'काहीच नाही'

'कॉफी विद करण 8' चे चार एपिसोड झाले असून त्याच्या 5 व्या एपिसोडची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. 'कॉफी विद करण 8' चा पहिला एपिसोड हा 26 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा कार्यक्रम तुम्ही डिज्नी+हॉटस्टार या कार्यक्रमात पाहू शकतात. या कार्यक्रमाचा श्री गणेशा करणनं रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या एन्ट्रीनं केला. दुसऱ्या एपिसोडमध्ये बॉबी देओल आणि सनी देओल दिसले होते. तिसऱ्या एपिसोडमध्ये सारा अली खान आणि अनन्या पांडे दिसले. चौथ्या एपिसोडमध्ये आलिया भट्ट आणि करीना कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहे.