अभिनेत्री वनिता खरातच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात

वनिता खरात  (Vanita Kharat) ने मराठीत तर आपला नाव कमावलचं आहे पण त्याचसोबत हिंदीमध्ये सुद्धा वनिताने आपला झेंडा रोवलाय 

Updated: Jan 14, 2023, 02:49 PM IST
अभिनेत्री वनिता खरातच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात  title=

मुंबई : सध्या सगळीकडे लगीनघाई सुरु झाली आहे आहे. मराठी सिनेसृष्टीतून लग्नाच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. नुकतंच हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Devdhar) यांचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटत पार पडला. या सेलिब्रिटी कपल (Celebrity Couple) च्या लग्नात बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता मराठी सिनेसृष्टीतील अजून एक अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ((Maharashtra Chi Hasya Jatra) या शोमुळे  घराघरात पोहचलेली अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 

वनिता खरात  (Vanita Kharat) ने मराठीत तर आपला नाव कमावलचं आहे पण त्याचसोबत हिंदीमध्ये सुद्धा वनिताने आपला झेंडा रोवलाय कबीर सिंग (Kabir Singh) सिनेमात तिने छोटीशी भूमिका साकारली पण त्यातून ती खूप प्रसिद्ध झाली. उत्तम अभिनय हाच कलाकाराचा खरा  दागिना असतो, मग त्याच्यासमोर  रंग रूप देहयष्टी  सगळं अगदी नथिंग असत हे वनिताने दाखवून दिलं. 

काही महिन्यांपूर्वीच वनिताने ती प्रेमात असल्याची कबुली दिली होती. ती आणि सुमित लोंढे रिलेशनशिपमध्ये असून, लवकरच ते लग्न देखील करणार आहे. वनिता आणि सुमित यांनी दिवाळी आणि नवीन वर्ष एकत्रच साजरे केलं होतं. याचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. आता त्याच्या लग्नाची तारीख नुकतीच अधिकृतपणे वनिताने सांगितली आहे.

'सरला एक कोटी' (Sarala Ek coti) या सिनेमाच्या ट्रेलर लाँन्चला आलेल्या वनिताने एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाची तारीख सांगितली आहे. ती येत्या २ फेब्रुवारी रोजी लगीनगाठ बांधत असून लवकरच ती याबाबत अजून माहिती देणार आहे. लग्न जवळ आलं असलं तरी तिला तयारीला अजिबातच वेळ नाही. ती शूटिंग सांभाळत मिळालेल्या वेळात तयारी करत असल्याचं तिने सांगितलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील अनेक मंडळी सुमितला ओळखतात. वनिताच्या लग्नाची तारीख अनेकदा जास्यजत्रेच्या अनेक स्किटमध्ये वापरण्यात आल्याचं देखील यावेळी तिने सांगितलं.सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर असून, त्याला फिरण्याची प्रचंड आवड आहे.