Valentine's Week Special : अमिताभ बच्चन यांचे 'हे' रोमॅंटिक चित्रपट आता घर बसल्या पाहा

Valentine's Day च्या निमित्तानं अमिताभ यांच्या चाहत्यांना त्यांचे हे लोकप्रिय ठरलेले चित्रपट रोमॅंटिक चित्रपट घरी बसल्या पाहता येणार आहेत. 

Updated: Feb 11, 2023, 11:03 AM IST
Valentine's Week Special :  अमिताभ बच्चन यांचे 'हे' रोमॅंटिक चित्रपट आता घर बसल्या पाहा  title=

Valentine's Day Special Amitabh Bachchan Romantic Movies : चित्रपटसृष्टीचे लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे गेल्या 5 दशकांपासून आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करत आहेत. या काळात अमिताभ यांनी अनेक रोमॅंटिक चित्रपट केले. या चित्रपटांमध्ये 'सिलसिला' (Silsila) ते 'चीनी कम' कम (Cheeni Kum) पर्यंत अनेक चित्रपटांचा समावेश आहे. आता व्हॅलेन्टाइन विक (Valentine Week) सुरु झालं आहे. अशात तुम्हाला अमिताभ यांचे काही चित्रपट घरी बसून OTT प्लॅटफॉर्मवर पाहायचे असतील तर तुम्ही पाहू शकता. 

'चीनी कम' (Cheeni Kum)

2007 मध्ये अमिताभ यांचा आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे नाव 'चीनी कम' असे आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी एका शेफची भूमिका साकारली होती जो त्याच्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. या चित्रपटात तब्बूने त्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि तब्बू यांच्यात दाखवण्यात आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अमिताभ बच्चन यांचा हा अप्रतिम रोमँटिक चित्रपट झी 5 वर पाहता येईल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'कभी कभी' (Kabhi Kabhie)

1976 साली प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या 'कभी कभी' चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर रोमान्सची एक छाप सोडली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच राखी गुलझार आणि नीतू सिंग देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. ज्यांना हा चित्रपट पाहायचा आहे ते अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 

'निशब्द' (Nishabd)

'निशब्द' हा चित्रपट 2007 साली प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अमिताभ हे अभिनेत्री जिया खानसोबत रोमान्स करताना दिसले. त्या दोघांमधील रोमान्स पाहून प्रेक्षकांना आश्चर्य झाले होते. खरंतर आपल्या पेक्षा वयानं खूप लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमान्स केल्यामुळे अमिताभ यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. दरम्यान, तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही डिस्ने+हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 

हेही वाचा : 'Ram Gopal Varma सोबत सलग काम केल्यामुळे मला...', Amruta Khanvilkar चा मोठा खुलासा

'सिलसिला' (Silsila)

यश चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी रेखा यांच्यासोबत रोमान्स केला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप  प्रेम दिले. हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.