मुंबई : लग्न एकदाच होते आणि प्रत्येकासाठी ते क्षण फार अविस्मरणीय असतात. त्यामुळे त्या दिवशी सुंदर, आकर्षक आणि इतरांपेक्षा वेगळे दिसावे, अशी प्रत्येकीची अपेक्षा असते. त्यासाठी तुम्हाला योग्य ड्रेस, ज्वेलरी त्याचबरोबर ड्रेसचे टेक्शर, फिनिशिंग आणि रंग याकडेही नीट लक्ष द्यायला हवे. उर्वशीच्या या लूकमधून तुम्हाला काही आयडियाज मिळतील. पहा तिचा हा ड्रामेटिक आणि रॉयल लूक...
तुमचा पूर्व ब्रायडल लूक तुम्ही वेगळा करू शकता. पारंपारिक लाल आणि गुलाबी रंगाला छेद देत तुम्ही पेस्टल कलर्सची निवड करु शकता. हे रंग आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत.
तुम्हाला काही वेगळे करायचे असेल तर तुम्ही हे रंग नक्कीच ट्राय करु शकता. पहा उर्वशीचा हा ब्रायडल लूक...
उर्वशीचा हा ब्रायडल लूक खूप व्हायरल होत आहे. उर्वशीचे हे फोटोज प्रसिद्ध डिझाईनर विक्रम फडणीसच्या फॅशन इव्टेंड्सचे आहेत. पेस्टल सी ग्रीन रंगाच्या लेहंग्यात ती अत्यंत सुंदर दिसत आहे.
हलक्या रंगाच्या ब्राईडल आऊटफिटसोबत ज्वेलरी अत्यंत आकर्षक दिसते. यावर सिल्वर ज्वेलरी खूप छान दिसेल. तसंच तुम्ही गोल्ड किंवा मोत्याची ज्वेलरीही ट्राय करु शकता. त्यामुळे तुमचा लूक आकर्षक, वेगळा आणि अविस्मरणीय होईल.