Urvashi Rautela New Home: उर्वशी रौतेलाने मुंबईत विकत घेतला 190 कोटींचा बंगला! शेजारी आहेत फाराच खास

Bollywood Actress New Bungalow: अनेक महिन्यांपासून ही अभिनेत्री मुंबईमध्ये चांगल्या जागेच्या शोधात होती. मात्र आता तिचा हा शोध संपला असून तिने मुंबईतील जुहूमध्ये एक आलिशान बंगला विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. हा बंगला चार मजल्यांचा असून त्याच्यासमोर मोठं गार्डनही आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 1, 2023, 05:21 PM IST
Urvashi Rautela New Home: उर्वशी रौतेलाने मुंबईत विकत घेतला 190 कोटींचा बंगला! शेजारी आहेत फाराच खास title=
मागील अनेक महिन्यांपासून ती घर शोधत होती

Urvashi Rautela New Bungalow: अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील फोटो आणि व्हिडीओमुळे चांगलीच चर्चेत असते. मॉडेलिंगमधून अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करण्यापर्यंतचा उर्वशीचा प्रवास हा फारच रंजक राहिला आहे. मॉडेल असताना तिने अनेक पुरस्कारही पटकावले आहेत. अनेकदा ती तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे चाहत्यांना आश्चर्याचे धक्के देत असते. बऱ्याच वेळा ती दैनंदिन आयुष्याशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मात्र तिच्या या धक्कातंत्राचा नवा विषय वेगळाच आहे. कारण सध्या तिच्या चाहत्यांना तिने एक सुखद धक्का देताना चक्क आलिशान बंगला खरेदी केल्याचं समोर आलं आहे.

कसा आहे हा बंगला?

उर्वशीच्या मालकीचा हा बंगला 4 मजल्यांचा आहे. उर्वशी आता याच बंगल्यात राहणार आहे. उर्वशी रौतेलाचं हे नवीन आलीशान घर मुंबईमधील जुहूमधील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये आहे. या बंगल्याचं नाव सेलिस्ट (Celest) असं आहे. या घरासमोर मोठं गार्डन आहे. तसेच आतमध्ये अनेक सुविधा आहेत. घराचं इंटिरियर घराप्रमाणेच आकर्षक आणि आलिशान आहे. घरात एक पर्सनल जीमही आहे. मागील अनेक महिन्यांपासून उर्वशी मुंबईमध्ये घर शोधत होती. अखेर तिचा हा शोध संपला आहे. मात्र उर्वशी मागील 2 ते 3 महिन्यांपासून या बंगल्यात वास्तव्यास आहे. तरीही तिने या बंगल्यासंदर्भातील माहिती जाहीर केली नव्हती. उर्वशीने हा बंगला विकत घेतला असून या बंगल्याची किंमत 190 कोटी रुपये इतकी आहे. मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार उर्वशीच घर हे प्रसिद्ध दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या घराच्या शेजारीच आहे. 

कामापेक्षा नको त्या गोष्टींमुळेच चर्चेत

उर्वशी तिच्या चित्रपटांमध्ये कधीच फारशी चर्चेत राहिलेली नाही. मात्र तिच्या आलिशान लाइफस्टाइलमुळे ती कायमच चर्चेत असते. काही आठवड्यांपूर्वीच ती 'कान्स फिल्म फेस्टीव्हल'मध्ये सहभागी झाली होती. उर्वशीने परिधान केलेल्या आलिशान गाउनने अनेकांचं लक्ष वेधलं होतं. 'इंस्पेक्टर अविनाश' या वेब सीरीजमध्येही उर्वशी पाहाला मिळाली. लवकरच ती परवीन बाबी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्येही झळकणार आहे.

उर्वशीचं नावं ऋषभ पंतशी जोडलं गेलं. एका मुलाखतीमध्ये उर्वशीने आरपी नावाने एका व्यक्तीचा उल्लेख करताना तो माझी वाट पाहत बराच वेळ हॉटेलच्या लॉबीमध्ये थांबला होता असं म्हटलेलं. ही आरपी नावाची व्यक्ती म्हणजे ऋषभ पंत असल्याची चर्चा सोशल मीडियावरुन सुरु झाली. यानंतर या दोघांनीही एकमेकांना अप्रत्यक्षपणे टोले लगावले होते.