2000 सिम कार्ड्सच्या ड्रेसमुळे Urfi Javed च्या घरी पोहोचले पोलीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Sep 24, 2022, 09:38 AM IST
2000 सिम कार्ड्सच्या ड्रेसमुळे Urfi Javed च्या घरी पोहोचले पोलीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण title=

मुंबई : 'बिग बॉस ओटीटी'मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री आणि फॅशन दिवा उर्फी जावेद (Urfi Javed) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी उर्फीनं तिच्या फॅशनने भल्याभल्यांचे होश उडवले. उर्फीचा नवा आउटफिटपाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. यावेळी उर्फीनं चक्क सिमकार्डपासून बनवलेला ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमुळे उर्फीच्या घरी पोलिसांनी हजेरी लावली आहे. (Urfi Javed Sim Card Dress) 

आणखी वाचा : मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणं योग्य की अयोग्य? 

उर्फीनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. उर्फीनं हा व्हिडीओ नेटफ्लिक्ससोबत केला आहे. या व्हिडीओत उर्फीनं क्रॉप टॉप आणि शॉर्ट स्कर्ट परिधान केला आहे. नेटफ्लिक्सच्या सीरिज 'जमतारा 2' (Jamtara 2)' चे डिझायनर तिला सिमकार्डनं बनवलेलं ड्रेस विकून लाखो रुपयांची फसवणूक करतात. (Urfi Javed Viral Video)

आणखी वाचा : 'हा मुलगा मोठा होऊन....', Sonam Kapoor च्या मुलाविषयी मोठी भविष्यवाणी आली समोर

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : Deepika Padukone ला पाहताच Urvashi Rautela चं विचित्र कृत्य, पाहा Photo

सुमारे 2 हजार सिम कार्डपासून हा ड्रेस बनवला आहे. या ड्रेससाठी उर्फी चक्क 5 लाख 20 हजार रुपये खर्च करते. उर्फी हा नवीन ड्रेस परिधान करत जेव्हा फोटो काढत असते तेव्हा पोलिस तिच्या घरी येतात. त्यावेळी पोलिस उर्फीला सांगतात की हे सगळे सिम कार्ड स्कॅम घोटाळ्यातले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत उर्फी कॅप्शन देते की 'ब्रेकिंग न्यूज, उर्फी जावेदसोबत फसवणूक झाली. आता सगळ्यांचा नंबर येईल.' (Urfi Javed Sim Cards Outfit Video Goes Viral Police Show Up At Her Place)

आणखी वाचा : Kareena Kapoor पासून अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीचे MMS झाले लीक

सोशल मीडियावर उर्फी नेहमीच त्याच्या लूक आणि फॅशन क्रिएटिव्हिटीमुळे चर्चेत असते. तिच्या ड्रेसिंग सेन्सलाही अनेकदा ट्रोल करण्यात येतं, पण उर्फी ट्रोल करणाऱ्यांकडे फारसं लक्ष देत नाही आणि नवीन आयड्यासोबत फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते.  (Urfi Javed Fashion)