उर्फी म्हणते, मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही...'हे' धक्कादायक कारण समोर

उर्फी जावेदनं आणखी एक धाडसी विधान केलं आहे ते म्हणजे, मी मुस्लिम असले तरी मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही.  त्यामागचे कारणही तिनं उघड केलंय.

Updated: May 5, 2022, 12:43 PM IST
उर्फी म्हणते, मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही...'हे' धक्कादायक कारण समोर title=

मुंबईः अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या खास फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. याशिवाय ती तिच्या सडेतोड बोलण्यासाठीही ओळखली जाते. आता तिनं आणखी एक धाडसी विधान केलं आहे ते म्हणजे, मी मुस्लिम असले तरी मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही. त्यामागचे कारणही तिनं उघड केलंय.

एका मुलाखतीदरम्यान उर्फी जावेदने सांगितले की, जेव्हाही तिला बोल्ड लूकमध्ये पाहिले जातं, तेव्हा तिचा समाज तिला नाकारतो, कारण तिचा इंडस्ट्रीत कोणीही गॉडफादर नाही आणि मुख्य म्हणजे ती मुस्लिम आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी म्हणाली, 'मी मुस्लिम मुलगी आहे. सोशल मीडियावर जेव्हा लोक माझ्यावर घाणेरड्या कमेंट करतात, तेव्हा त्यात बहुतांश मुस्लिम लोक असतात. त्या लोकांना वाटते की मी इस्लामची प्रतिमा खराब करत आहे.
ते माझा तिरस्कार करतात कारण मुस्लिम पुरुषांना त्यांच्या समाजातील स्त्रियांनी विशिष्ट पद्धतीने वागावं असं वाटतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी जावेद पुढे म्हणाली, 'त्यांना समाजातील सर्व महिलांवर नियंत्रण ठेवायचं आहे आणि हेच कारण आहे की मी इस्लामवर विश्वास ठेवत नाही. मला ट्रोल करण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे ते माझ्याकडून धर्मानुसार वागण्याची अपेक्षा करतात तसं मी वागत नाही.

जेव्हा उर्फीला विचारण्यात आले की, ती तिच्या धर्माबाहेरील मुलाशी लग्न करणार आहे का? तर यावर ती म्हणाली, 'मी कधीही मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही. माझा इस्लामवर विश्वास नाही. मी कोणताही धर्म पाळत नाही, त्यामुळे मी कोणावर प्रेम करते याची मला पर्वा नाही. 

उर्फी जावेद म्हणते की,  कोणालाही धर्माचं पालन करण्यास भाग पाडू नये. प्रत्येकाला स्वतःचा धर्म निवडण्याचा आणि पाळण्याचा अधिकार आहे. ती म्हणते, माझी आई खूप धार्मिक महिला आहे, पण तिने कधीही आमच्यावर धर्म लादला नाही. माझे भाऊ आणि बहिणी इस्लामचे पालन करतात, परंतु मी तसं करत नाही.

त्यांनी मला कधीही धर्माचे पालन करण्यास भाग पाडलं नाही. तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांवर धर्म लादू शकत नाही. ते हृदयातून आले पाहिजे. जर तसं नसेल, तर ना तुम्ही आनंदी व्हाल आणि ना अल्लाह.