पुढे आणि मागे उघडंच... अभिनेत्री स्टाईलच्या नादात कपड्याचं जे केलं.. व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री त्या स्टाईलमुळे  एक ट्रोलर म्हणाला ''कधी जर हवा जोरात चालली तर...''

Updated: Feb 5, 2022, 05:47 PM IST
पुढे आणि मागे उघडंच... अभिनेत्री स्टाईलच्या नादात कपड्याचं जे केलं.. व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : ग्लॅमरस अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तिची आगळीवेगळी स्टाईल आणि तिच्या अदांमुळे ती नेहमी चर्चेत असते. उर्फीने आणखी एक नवा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिच्या अनोख्या स्टाईलमुळे सोशल मीडियाचा पारा वाढला आहे. 

उर्फीने फ्रंट ओपन आणि बॅकलेस जांभळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. हा ड्रेस समोरून पाहिला तर ओढणीने स्टाईल केल्यासारखाच वाटतो. अभिनेत्रीने या ड्रेसमधील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

उर्फीने बोल्ड लूक दिला आहे. तिच्या या लूकची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. बॅकलेस ड्रेसमध्ये उर्फीने किलर लूक दिला आहे. या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चा होत आहे. काही जणांनी उर्फीच्या या लूकवर टीका देखील केली आहे. उर्फीचे बरेच ड्रेस बॅकलेस असतात. तिला बॅकलेस ड्रेस जास्त आवडत असावेत असं चाहत्यांचं म्हणणं आहे. 

एका युझरने तर ट्रोल करत अभिनेत्रीला म्हटलं आहे की जोरात हवा आली तर असं म्हणत त्याने कमेंट केली आहे. अभिनेत्रीच्या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urrfii (@urf7i)