उर्फीचा पुन्हा तमाशा... 'हा' Video पाहून तुमचाही संताप गाठेल परिसीमा

 फोटो आणि व्हिडिओंमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

Updated: Jul 29, 2022, 04:41 PM IST
उर्फीचा पुन्हा तमाशा... 'हा' Video पाहून तुमचाही संताप गाठेल परिसीमा title=

Urfi Javed: सतत चर्चेत असणारी उर्फी ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'बिग बॉस ओटीटी'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर आपल्या विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे लोकांना आकर्षित करणारी उर्फी जावेद रोजच चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असलेली उर्फी अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या प्रोफाइलवर अपलोड करत असते. या फोटो आणि व्हिडिओंमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

आज उर्फीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती फोटोग्राफर्सची जोरजोरात भांडत होती. नुकताच राखीने रस्त्यावर तमाशा केला होता. तेव्हा तिलाही चाहत्यांनी प्रचंड ट्रोल केलं होतं. त्यात तर कहर म्हणजे रिक्षावाल्याने तिला चक्क हाकलून लावलं होतं. पण आता राखीची मैत्रीण उर्फी जावेदनेही आता एक नवा हंगामा केला आहे. ती मध्यरात्रीच एका पार्टीसाठी एक क्लबमध्ये गेली होती. त्याचसोबत तिच्या मैत्रीणीही होत्या.

ती कल्बबाहेर स्पॉट झाल्यामुळे पापराझी तिचा फोटो काढण्यासाठी उत्सुक होते. पण उर्फी फारच थकल्याने ती तिचा व्हिडीओ किंवा फोटो त्यांना काढू देत नव्हती. तर त्यातून तिने जोरजोरात कांगावा करायाला सुरूवात केली. त्यावर अजून भडकत गाडीच्या खिडकीतूनही तिने डोकं वर काढले आणि परत जोरात ओरडलयला लागली. ओरडत ती फोटोग्राफर्सना म्हणाली अब क्या कार सें झलांग लागाऊ क्या...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फॅशन आयकॉन बनलेली उर्फी जावेद प्रत्येक दिवशी काही ना काही करतच असते. ती जे करते ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं. आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या नव्या फॅशन प्रयोगाचा व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पुन्हा एकदा ग्लॅमर आणि बोल्डनेसचा तडका दाखवताना दिसते आहे.