मराठीतलं पहिलं बोल्डेस्ट गाणं

हे आतापर्यंतचं सर्वांत बोल्ड गाणं असल्याचं म्हटलं जात आहे.

Updated: Jun 12, 2019, 04:41 PM IST
मराठीतलं पहिलं बोल्डेस्ट गाणं  title=

मुंबई : बॉलिवूडप्रमाणे आता मराठीतही मसालेदार आणि बोल्ड गाण्यांची भुरळ पडू लागली आहे. मिलिंद कवडे दिग्दर्शित 'टकाटक' या चित्रपटातील असंच एक गाणं सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मराठीतील हे आतापर्यंतचं सर्वांत बोल्ड गाणं असल्याचं म्हटलं जात आहे. जय अत्रे लिखित‘ये चंद्राला’हे गाणं श्रुती राणेनं संगीतबद्ध केलं आहे. या गाण्यात अभिजीत आमकर आणि प्रणाली भालेराव या जोडीचा पडद्यावरचा हा रोमान्स चर्चेचा विषय बनला आहे.

 
 
 
 

'दोन जीवांचा मधुर मेळ... अधीर भावनांचा खट्याळ खेळ' सादर आहे या वर्षातलं Boldest मराठी गाणं 'ये चंद्राला'. पाहा संपूर्ण गाणं: Link In Bio #YeChandrala #SongOutNow #Takatak #28June Song: Ye Chandrala Singer - Shruti Rane Music - Arun Likhate Lyricist - Jai Atre Choreographer - #RahulSanjeer A Film By: @MilindArunKavde Song On: @ZeeMusicMarathi @prathameshparab @shrotriritikaofficial @abhijit.amkar @pranali.bhalerao @ajaythakur.14 @iomprakashbhatt #SujayShankarwar #RaviBahri #InderjeetSingh #DhananjaySinghMasoom #RabindraChaubey @VarunLikhate #JaiAtre @purplebullent #Vpatkefilms #GaonwalaCreation Follow us on: Facebook/Twitter/Instagram: @takatakfilm

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab) on

मिलिंद कवडे दिग्दर्शित 'टकाटक' चित्रपटातून प्रथमेश परब प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'टकाटक' चित्रपट येत्या २८ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून एक वेगळं कथानक साकारण्यात आलं आहे. प्रथमेश परबसोबत ऋतिका जोशी ही अभिनेत्री स्क्रिन शेअर करणार आहे. प्रथमेश आणि ऋतिका व्यतिरिक्त चित्रपटात अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव, भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर हे कलाकारही भूमिका साकारणार आहेत. सोशल मीडियावर या गाण्याची मोठी चर्चा आहे.