उलगडणार नात्यांमधील अतूटता; 'मल्हार' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

अभिनेत्री अंजली पाटील ज्यांनी हिंदी, मराठी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये आपल्या कलेची छाप सोडली आहे, त्यांचा अभिनय ही खूप दमदार आहे. ह्या चित्रपटामध्ये अंजली केसरीची भूमिका साकारत आहे. 

Updated: May 23, 2024, 01:47 PM IST
उलगडणार नात्यांमधील अतूटता; 'मल्हार' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद title=

मुंबई : नात्यामधल्या अलगद हृदयाला स्पर्श करणाऱ्या प्रेमाचा 'मल्हार ' ह्या चित्रपटा चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. निर्माता प्रफुल्ल पासड यांच्या मल्हार चित्रपटात तीन कथानकांचा समावेश आहे. "पब्लिक डिमांड पूर्ण करणे हेच आमचे काम" शारिब हाशमी च्या ह्या डायलॉग ने 'मल्हार' चित्रपटामध्ये त्यांच्या भूमिकेची ओळख होत आहे. हा चित्रपट 7 जून 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.   चित्रपट "मल्हार" श्रीनिवास पोकळे, शारीब हाशमी, अंजली पाटील, ऋषी सक्सेना, मोहम्मद समद, विनायक पोतदार आणि अक्षता आचार्य यांसारख्या अनुभवी कलाकारांनी सजलेल्या तीन कथानकांचा अप्रतिम संगम आहे आणि या कथा एकमेकांशी जोडलेल्या असून एकाच गावात घटत आहेत. 

निर्माते प्रफुल्ल पासड यांचा मल्हार हा चित्रपट कच्छ गावात घडणाऱ्या तीन कथांचे अनोखे मिश्रण आहे. या चित्रपटात दोन लहान मुलांच्या जिवलग मैत्रीची कहाणी आहे.  तसेच हिंदू मुलगा आणि मुसलमान मुलगी यांच्या निरागस प्रेमाचा प्रवास व एका निस्वार्थ  जोडप्याचं अदृश्य प्रेम येथे पाहायला मिळणार आहे. ज्याची छोटीशी झलक आपल्याला मल्हार चित्रपटाच्या 1 मिनिट 25 सेकंदाच्या ट्रेलर मध्ये पाहायला मिळेल. 

ह्या ट्रेलर ची सुरुवात  शरीब हाशमीच्या संवादाने सुरू होत आहे. तो म्हणतो, "वेलकम टू माय विलेज " तसेच  श्रवणयंत्र दुरुस्त करण्यासाठी त्या दोन लहान मित्राची धडपड पाहायला मिळते, ज्यात  ‘आई म्हणते देव मुलांचं सगळं ऐकतो’ हा बालकलाकारांचा हा संवाद हृदयाला भिडणारा आहे.

अभिनेत्री अंजली पाटील ज्यांनी हिंदी, मराठी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये आपल्या कलेची छाप सोडली आहे, त्यांचा अभिनय ही खूप दमदार आहे. ह्या चित्रपटामध्ये अंजली केसरीची भूमिका साकारत आहे. केसरचे नुकतेच गावच्या सरपंचा च्या  मुलाशी लक्ष्मणशी लग्न झाले आहे. काही काळ उलटल्या नंतरही गोड बातमी न मिळाल्यामुळे सासरची मंडळी तिला सतत टोमणे देत आहेत. आपले नाते टिकवून ती ह्या अडचणीतून  कशी बाहेर पडते हे ह्या चित्रपटात दाखवले आहे 

अभिनेता शारीब हाशमी म्हणतात की मला मल्हारचा भाग बनण्याची संधी मिळाली हेच खूप आनंददायक आहे. चित्रपटाच्या तीन कथांपैकी एक कथा जावेद आणि त्याची मोठी बहीण जस्मिनची असल्याचे ते सांगतात. जास्मिन चे मन जतीन या हिंदू मुलाच्या प्रेमात गुंतले आहे. त्यांच्या जीवनात पुढे काय होईल ह्याची उत्सुकता ट्रेलर पाहिल्यावर  प्रेक्षकांच्या मनात  उद्भवणार आहे.

या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, शारीब हाशमी, अंजली पाटील, ऋषी सक्सेना, मोहम्मद समद आणि अक्षता आचार्य यांच्या भूमिका आहेत, या चित्रपटाची निर्मिती प्रफुल्ल पासड यांनी केली असून दिग्दर्शन विशाल कुंभार यांनी केले आहे. चित्रपटाचे संवाद सिद्धार्थ साळवी, स्वप्नील सीताराम यांनी लिहिले आहेत तर पटकथा विशाल कुंभार, अपूर्वा पाटील यांनी लिहिली आहे. छायांकन गणेश कांबळे, संकलन अक्षय कुमार, संगीत टी. सतीश आणि सारंग कुलकर्णी यांचे आहे. हा चित्रपट 7 जून रोजी हिंदी आणि मराठी भाषेतील चित्रपटगृहात एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.