मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा चांगलेचं चर्तेत आहेत. मात्र सध्या एका वेगळ्या कारणामुळे ते सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहेत. एका नेत्याने विराट कोहलीला अनुष्काचा पाळीव कुत्रा असल्याचं म्हटल्यामुळे वाद चांगलाचं तापला आहे. विराट कोहली हा तर अनुष्काचा पाळीव प्राणी आहे, असे ट्विट एका नेत्याने आज केले आहे. काँग्रेसचे नेते उदीत राज यांनी हे ट्विट केलं आहे.
अनुष्का को अपने कुत्ते विराट कोहली को सम्भालने की ज़रूरत नही है। कुत्ता से ज़्यादा वफ़ादार कोई नही। कोहली ने तुम लुच्चे ,लफ़ंगों और मूर्खों को सीख दी थी कि प्रदूषण से मानवता ख़तरे में हैं।
तुम लोगों का डीएनए चेक कराना पड़ेगा कि तुम यहाँ के मूल निवासी हो कि नहीं?— Dr. Udit Raj (@Dr_Uditraj) November 15, 2020
ट्विट करत ते म्हणाले की, 'अनुष्का तुला तुझ्या पाळीव प्राण्याला म्हणजेच विराट कोहलीला पाळण्याची गरज नाही. एका कुत्र्यापेक्षा जास्त प्रामणिक कोणीही नाही. मानवतेला प्रदूषणाचा धोका आहे हे कोहलीने तुम्हाला मूर्ख लोकांना शिकवले होते. पण तुमच्या सारख्या लोकांचा डीएनए एकदा तरी तपासला पाहिजे.' असं ते म्हणाले.
शिवाय तुम्ही या देशाचे नागरिक आहात की नाही हे मुख्य तपासण्याची गरज असल्याचं देखील काँग्रेस नेते उदीत राज यांनी म्हटलं आहे. सध्या त्यांचं हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्विटनंतर उदीत राजे सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.
Happy Diwali pic.twitter.com/USLnZnMwzT
— Virat Kohli (@imVkohli) November 14, 2020
दरम्यान विराट कोहलीने दिवाळीच्या पहिल्या दिवशी पोस्ट केलेल्या व्हिडिओवर उदित राज यांनी टीका केली आहे. आपण सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करायला हवे. म्हणून यंदाच्या वर्षी दिवाळीला फटाके फोडू नका असं आवाहन विराटने नागरिकांना केलं.