मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. या धोकादायक व्हायरसची झळ सर्व सामान्य जनतेसह सेलिब्रिटींना देखील बसली आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी कोरोना व्हायरसवर मात केली आहे. तर आता 'सपना बाबुल का बिदाई' फेम अभिनेत्री सारा खानला देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. खुद्द साराने आपल्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर तिला घरातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ती म्हणाली, 'मी कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडली आहे. माझी प्रकृती अता ठिक आहे. लवकरात लवकर बरी होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे.' अधिकाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी तिला घरातच स्वतःला क्वरंटाइन करून घेण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ लाख ६२ हजार ४१५ वर पोहोचली आहे. त्यापैकी ९ लाख ४३ हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरू असून ३५ लाख ४२ हजार ६६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.